त्रिपुरा विधानसभेसाठी विक्रमी मतदान
त्रिपुरा विधानसभेसाठी विक्रमी ९० टक्के मतदान झालंय. पोस्टल मतांची मोजणी झाल्यानंतर हा आकडा ९२ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
नवी दिल्ली : त्रिपुरा विधानसभेसाठी विक्रमी ९० टक्के मतदान झालंय. पोस्टल मतांची मोजणी झाल्यानंतर हा आकडा ९२ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
त्रिपुरामध्ये रविवारी मतदान झालं. लोकशाहीच्या कार्यात मतदारांनी भरभरुन प्रतिसाद दिला. त्रिपुरा मध्ये नेहमीच मोठ्या प्रमाणात मतदान होतं. सध्या त्रिपुरामध्ये डाव्यांची सत्ता आहे.
त्रिपुराची जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीय, असा विश्वास डाव्या नेत्यांनी व्यक्त केलाय, तर लोकांमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात नाराजी आहे. त्यामुळे त्रिपुरात डाव्यांची सत्ता जाऊन भाजपला संधी मिळेल, अशी आशा भाजपनं व्यक्त केलीय. ३ मार्चला मतमोजणी होणार आहे.