How to get Subsidy on Solar Panel : वाढत्या महागाईने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. आता उन्हाळ्याच्या आगमनानंतर वीज बिलातही वाढ होणार आहे. (Electricity Bill)  तुमच्या घराचे विजेचे बिल जास्त येत असेल तर टेन्शन येते. मात्र, हे टेन्शन दूर करण्यासाठी सरकारही मदत करत आहे. त्यामुळे आता यापुढे तुमचे विद्युत बिल शून्य येण्यास मदत होणार आहे. (Free Electric Bill) त्यासासाठी तुम्हाला एक काम करावे लागणार आहे. जर तुम्हाला या समस्येपासून मुक्ती मिळवायची असेल, तर आम्ही तुम्हाला एक सोपा उपाय सांगत आहोत, ज्याद्वारे तुम्ही वीज बिल शून्यावर आणू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Electric Bill: घराच्या छतावर हे छोटे डिव्हाइस एकदा बसवा, कायमस्वरुपी वीज मोफत ! 


विजेचे बिल शून्य येण्यासाठी तुम्हाला एकदाच खर्च करावा लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनल लावावे लागतील. यासाठी सरकार तुम्हाला मदत करेल आणि अनुदान (सबसिडी) मिळेल. हरित ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार सौर पॅनेलवर सबसिडी देत आहे, तसे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


वर्षभरात किती बिल येते, ते आधी जाणून घ्या?


तुम्ही सोलार पॅनल बसविण्यासाठी तुमच्या विद्युत बिलावर वर्षभर किती बिल येते ते पाहा. त्याचा अभ्यास करा आणि त्यानुसार तुम्ही हे सोलार पॅनल बसवू शकता. सर्वप्रथम तुम्‍हाला तुमच्‍या घरातील विजेच्‍या गरजा शोधाव्या लागतील, जेणेकरुन तुम्‍हाला दररोज किती युनिट विजेची गरज आहे हे कळू शकेल. यानंतर गरजेनुसार सोलार पॅनल बसवावे लागतील. साधारणपणे घराला दररोज 6-8 युनिट वीज लागते. तसेच घरात 2-3 पंखे, एक फ्रीज, एक टीव्ही, एक पाण्याची मोटर आणि 6-8 एलईडी दिवे चालवता येतात.


6-8 युनिट्सच्या वापरासाठी 2 kW सौर पॅनल 


एखाद्या घरात दररोज 6-8 युनिट विजेचा वापर होत असेल, तर त्यासाठी 2 किलोवॅट क्षमतेचे सोलार पॅनल बसवावे लागतील. यासाठी घराच्या छतावर 4 सोलर पॅनल बसवावे लागतील, त्याद्वारे दररोज 6-8 युनिटपर्यंत वीजनिर्मिती करता येईल.


सोलर पॅनल बसवण्यासाठी किती खर्च येतो?


दोन किलोवॅटचे सोलार पॅनल बसवण्यासाठी साधारण 1.2 लाख रुपये खर्च येतो, ज्यावर सरकारकडून सबसिडीही दिली जाते. सोलार पॅनलचे आयुष्य सुमारे 25 वर्षे असते, म्हणजेच एकदा सोलर पॅनल बसवले की वीज बिल शून्य होते.


सोलर पॅनलवर किती मिळते अनुदान?


 ऊर्जा मंत्रालयाने  (Ministry of New & Renewable Energy) सौर रुफटॉप योजना सुरु केली आहे आणि त्याअंतर्गत सरकारकडून 40 टक्के पर्यंत सबसिडी दिली जाते. अशा परिस्थितीत 2 किलोवॅट क्षमतेचे सोलार पॅनल बसवल्यास सरकारकडून 48 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळेल. म्हणजेच तुम्हाला 72 हजार रुपये खर्च करावे लागतील.