मुंबई : समाजमाध्यमात (सोशल मीडिया) सध्या धुम्रपान करत असलेल्या मादी हत्तीचा व्हिडिओ भलताच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ Wildlife Conservation Society-India नावाच्या फेसबुक पेजवरून मंगळवारी (२० मार्च) शेअर करण्यात आला. शेअर करताच हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे. त्याहूनही अधिक लोकांनी लाईक केला आहे. कमेंट बॉक्समध्ये तर, प्रतिक्रियांचा खचच पडला आहे.


हत्तीचे वय ३० ते ३५ वर्षे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, एका हत्तीचे हे एक असामान्य वर्तन असून, हा व्हिडिओ कर्नाटकातील नागरहोल नॅशनल पार्कमध्ये कॅमेऱ्यात कैद झाला. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार वन्यजीव संरक्षण सोसायटी भारत मधील संरक्षण सहाय्यता आणि नीती सहाय्यक निर्देशक विनय कुमार यांनी हा व्हिडिओ २०१६मध्ये शूट केला आहे. मात्र, फेसबुकवर  हा व्हिडिओ नुकताच पोस्ट करण्यात आला. व्हिडिओ पाहिल्यास ध्यानात येते की, आपल्या सोंडेच्या सहाय्याने जंगलातील आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या जमीनीतील काहीतरी उचलून हत्ती आपल्या तोंडात घालतो आहे. ज्यामुळे हत्तीच्या तोंडातून आणि सोंडेतूनही धुराचा लोट बाहेर पडताना दिसतो आहे. विनय कुमार यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या माहितीत या मादी हत्तीचे वय ३० ते ३५ वर्षे इतके असावे असे म्हटले आहे.



औषधी गुणधर्मामुळे आकर्षीत


डब्ल्यूसीएस इंडियाचे संशोधक डॉक्टर वरून गोस्वामी यांनी हत्तीच्या धुम्रपानामागचे सत्य सांगितले. वरून गोस्वामी म्हणतात, 'हत्ती लाकडाच्या कोळशासोबत खेळण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे त्याच्या तोंडातून धुराच्या रूपाने राख बाहेर पडत होती. दुरून पाहताना ती धुर असल्याचा भास होतो. पण, तो राख बाहेर टाकून इतर पदार्थ खात होता.' दरम्यान, लाकडी कोळशात भलेही काही पोषक तत्व असत नाहीत. पण, जंगली जनावर कादाचीत त्याच्यातील औषधी गुणधर्मामुळे त्याकडे आकर्षीत होत असावेत, असेही डॉ. गोस्वामी सांगतात.