Mom Feeding Son On Railway Station: घरापासून लांब राहणारं लेकरू जेव्हा घरी येतं, तेव्हा प्रत्येक आईचा (Mother ) प्रश्न असतो, खराब झालंय माझं बाळ... खात पित नाय का? जेवण करताना पोट भरलं असलं तरी अर्धी चपाती अजून खा म्हणून बळजबरीने ताटात वाढणाऱ्या आईच्या प्रेमाची तुलना होऊ शकत नाही. अशातच आता एक व्हिडिओ Viral Video) समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आईच्या प्रेमाशी निगडीत असाच एक सुंदर व्हिडिओ (Emotional Heart Touching Mother Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्याला पाहून अनेकजण भावूक झाले आहेत. एका माय लेकाचा हा व्हिडीओ एका रेल्वे स्टेशनवरील (Railway Station) असल्याचं दिसून येतंय. प्लॅटफॉर्मवर एक बेंच आहे ज्यावर एक आई आपल्या मुलासोबत बसली आहे. मुलाच्या पाठीवर बॅग लटकवली आहे. त्यावेळी एका बाकावर बसलेल्या आईने आपल्या पोटच्या पोराला मायेने घास भरवला. मुलाला घास भरवल्यानंतर आईने स्वत: घास घेतला. माय लेकराचा हा व्हिडीओ सध्या ट्रेंडिंगमध्ये (Trending Video) असल्याचं दिसत आहे.


पाहा Video



एका रेल्वे प्लॉटफॉर्मवर थांबली असताना रेल्वेमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने आई आणि मुलाचा हा हृदयस्पर्शी (Railway Station Viral Video) व्हिडीओ शुट केला. मुलगा कितीही मोठा झाला तरी आईसाठी तो लहानच असतो, असं नेटकऱ्यांनी कमेंटकरत म्हटलं आहे. सध्या हा व्हिडीओ इन्टाग्रामवर तुफान शेअर केला जात आहे. सध्या या व्हिडीओला 25 हजारांहून अधिक लाईक्स आणि 2 लाख 97 हजार व्ह्यूज मिळाले आहेत.


आणखी वाचा - पोरीची छेड काढली अन् वरून दादागिरी; भर रस्त्यात पोलिसाने दाखवला इंगा, पाहा कसा उतरवला माज!


दरम्यान, जिंदगी गुलजार है या अकाऊंटवरून 10 जुलै रोजी हा व्हिडीओ शेअर केला गेला आहे. एका इंटरनेट यूजरने कमेंट बॉक्सवर लिहिलं, 'आईनंतर असं प्रेम कोणी करत नाही, त्यामुळे ज्यांच्याकडे आई आहे त्यांची कदर करा.' आई आणि मुलाच्या प्रेमाचे वर्णन करणारे अनेक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल असतात. मात्र, सध्याच्या या व्हिडीओने अनेकांची मनं जिंकली आहेत.