`पंकज तुझी नोकरी धोक्यात आहे`; Online Meeting मध्ये सुरु राहिला मायक्रोफोन आणि मग पुढे.....
हल्ली सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीए व्हायरल होत असतात. यामध्ये अनेक कॉर्पोरेट्स ऑफिसचे किंवा कॉर्पोरेट मिटिंगचे व्हिडीओ असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आपल्या कामाचा भाग आणि कामाचे तास इतके वाढले आहेत की, आपला संपूर्ण दिवस त्यामध्ये निघून जातो. अशावेळी कामावर अनेक गोष्टी घडत असतात. त्याक्षणाला या गोष्टी किचकट किंवा थोड्या त्रासदायक वाटत असतात. पण जेव्हा त्याचा व्हिडीओ व्हायरल होतो तेव्हा त्याची गम्मत वेगळीच असते.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका कार्पोरेट ऑफिसच्या मीटिंगचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये बॉस संध्याकाळी 7 वाजता मिटिंग अरेंज करतो. संध्याकाळी निघण्याच्या वेळेला काम देणारे बॉस अनेक कर्मचाऱ्यांमध्ये लोकप्रिय आहेत.
व्हिडीओत नेमकं काय?
या व्हिडीओत पाच फ्रेम दिसत आहेत. बॉस, कर्मचारी आणि एचआर असल्याच दिसत आहे. यामध्ये एक कर्मचारी वर्क फ्रॉम होम करताना दिसत आहे. जो संध्याकाळी आपल्या पत्नीसोबत मुसाफा सिनेमा पाहायला जाणार होता. पण अचानक मिटिंग लागल्यामुळे त्यांना उशिर होत असल्यामुळे पत्नी चिडचिड करते.
हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यामध्ये त्या कर्मचाऱ्याची पत्नी त्याला आताच लॅपटॉप सुरु करायला हवा होता का? असा प्रश्न विचारते. तेव्हा तो कर्मचारी चिडून बोलतो की, आता यांना 6 वाजताच मिटिंग ठेवायची आहे तर मी पण काय करु. मला पण मुसाफा सिनेमा पाहायचा आहे. पण मी काय करु. या व्यक्तीला कुणी बॉस बनवलं काय माहित. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या मिटिंगला कॅमेरा आणि मायक्रोफोन दोन्ही सुरु असतो. त्यामुळे हा सगळा प्रकार रेकॉर्ड झाला आहे.
सोशल मीडियावर असे प्रकार कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. आता हा व्हिडीओ खरा आहे की, खोटा याबद्दल फार माहिती नाही. हा फेक क्रिएट केला आहे का? असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे.