Video : बिर्याणी दिली नाही म्हणून कर्मचाऱ्याला बेदम मारहाण; मग पोलिसांनी घडवली कायमची अद्दल
तिघांनी मिळून एकाच कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करत हॉटेलच्या बाहेर नेले
कधी कधी भूक लागल्यानंतर माणूस अस्वस्थ होतो. काही जणांना भूक सहन होत नाही आणि त्यांच्याहातून काहीतरी भलतचं घडतं. हॉटेलमध्येही (Hotel) गेल्यावर कधी कधी ऑर्डर केलेले जेवण वेळेवर मिळत नाही. त्यामुळे हॉटेलवाल्यांसोबत ग्राहकांचे खटकेही उडतात. पण कधी हे प्रकरण हाणामारीपर्यंत गेल्याचं तुम्ही ऐकलय का? नाही ना. पण असाच प्रकार दिल्लीच्या (Delhi) नोएडात घडल्याचे समोर आलाय. वेळेवर जेवण न मिळाल्याने ग्राहकांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा प्रकार सीसीटीव्ही (CCTV) मध्ये कैद झालाय. (employee of a Greater Noida Zauk restaurant was attacked by 3 enraged persons)
ग्रेटर नोएडामधील (Greater Noida) एका रेस्टॉरंटचे (Restaurant) सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तीन तरुण रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्याला मारहाण करताना दिसत आहेत. या रेस्टॉरंटमध्ये तरुणांनी दिलेल्या ऑर्डला थोडा उशीर झाला होता. याचा राग आल्याने त्यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली. हा सर्व मारहाणीचा प्रकार रेस्टॉरंटमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत तिघांना अटक केलीय.
ग्रेटर नोएडातील अंसल मॉलमधील जोक रेस्टॉरंटमध्ये (Zauk restaurant) बुधावारी रात्री हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आले आहे. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास तीन तरुण जेवणासाठी पोहोचले होते. तिघांनी खाण्यासाठी बिर्याणीची ऑर्डर दिली होती. मात्र त्यांची ऑर्डर येण्यास थोडा उशीर झाला. त्यामुळे त्यांना राग इतका अनावर झाला की त्यांने रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्याला जबर मारहाण करण्यास सुरुवात केली.
व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण उठला आणि त्याने कर्मचाऱ्याला चापट मारून बाहेर ओढल्याचं दिसत आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये तीन लोक कर्मचाऱ्याला खाली पाडून मारहाण करताना दिसत आहेत. या मारहाणीचा व्हिडिओ रेस्टॉरंटमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. यानंतर रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्याने पोलिसांत या प्रकरणाची तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी मनोज, प्रवेश आणि जगत सिंग या तीन आरोपींना अटक केली आहे. तिघेही दादरी येथील रहिवासी आहेत.
सहाय्यक पोलीस उपायुक्त विशाल पांडे यांनी या प्रकरणाची माहिती दिली. "अंसल मॉलमधील एका खासगी रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांना ऑर्डर उशीर देण्यावरुन मारहाण करण्यात आली. दादरी येथील रहिवासी असलेल्या तिन्ही आरोपींना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे," असे विशाल पांडे यांनी म्हटलं आहे.