Noida Film City Encounter : आताची सर्वात मोठी बातमी...फिल्मसिटीमध्ये (Film City) पोलीस (Police) आणि बदमाशांमध्ये (miscreants) चकमक झाली आहे. या चकमकीमध्ये चेनू टोळीच्या (Chenu gang) एका सदस्याला पोलिसांनी गजाआड केलं आहे. हे  दिल्लीतील नोएडामधील पोलिसांचं मोठं यश म्हटलं जातं. आहे. नोएडा एडीसीपी आशुतोष द्विवेदी (Noida ADCP Ashutosh Dwivedi) यांनी दिलेल्या माहितीनुसार तपासणीदरम्यान एका संशयिताला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तो पळून गेला. फिल्म सिटीजवळ त्याची चकमक झाली, ज्यात तो (दानिश) जखमी झाला. दिल्ली एनसीआरमध्ये यावर 21 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. नोएडातही सेक्टर 20 मध्ये याबाबत गुन्हे दाखल आहेत. ज्यामध्ये त्याचा शोध घेतला जात होता.


बंदुक जप्त 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोएडा एडीसीपी आशुतोष द्विवेदी यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेला व्यक्ती चेनू टोळीचा शूटर आहे. त्याच्याकडून चोरीची मोटारसायकल, एक बंदुक आणि 3 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. अन्य आरोपांचा तपास सुरू असून घटनास्थळावरून फरार झालेल्या अन्य एका व्यक्तीचा शोध सुरू आहे. 



1 दिवसांपूर्वी नोएडा सेक्टर 113 मध्ये चकमक


यापूर्वी, गुरुवारी नोएडा सेक्टर 113 पोलीस स्टेशन परिसरात पोलीस आणि बदमाशांमध्ये चकमक झाली होती. या परिसरात एक बदमाश आणि त्याचा साथीदार चेन स्नॅचिंगच्या उद्देशाने आला होता. पोलिसांनी पाठलाग केला असता हल्लेखोराने गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो जखमी झाला. 3 मोबाईल, मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. त्याच्या जोडीदाराचा शोध सुरू आहे.