जम्मू-काश्मीर : दोन ठिकाणी चकमक सुरु, एक दहशतवादी ठार तर २-३ लपल्याची भीती
अवंतीपोरा भागात सुरक्षा दलाचे जवान आणि अतिरेक्यांच्या दरम्यान सुरु असलेल्या चकमकीत एक अतिरेकी ठार झाल्याची माहिती आहे.
जम्मू-काश्मीर : पुलवामा (Pulwama) जिल्ह्यातील दक्षिणेकडील अवंतीपोरा भागात सुरक्षा दलाचे जवान आणि अतिरेक्यांच्या दरम्यान सुरु असलेल्या चकमकीत एक अतिरेकी ठार झाल्याची माहिती आहे. सुरक्षा दलाने अवंतीपोरा येथे पामपोरला वेढले होते, जेथे २-३ अतिरेकी लपल्याचा संशय आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर रियाज नायकू येथे लपला असावा, अशी शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार लष्कराची 50RR, CRPF की 185BN आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने ख्रू पानपोरच्या शहरी परिसराला घेरले आणि शोध मोहीम सुरू केली. या शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा कर्मचारी आणि दहशतवादी यांच्यात चकमकीला सुरुवात झाली. सुरक्षा दलाने संशयास्पद जागेला घेराव घातला असून या भागात शोध मोहीम सुरु केली आहे. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे.
त्याचबरोबर अवंतीपोरा येथील बेगपोरा भागात शोध मोहीम सुरु आहे. जिथे हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर रियाज नायकू लपल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे रियाज नायकूचे वडिलोपार्जित गाव आहे. माहिती मिळाल्यानंतरच शोध मोहीम सुरु करण्यात आली. चार दिवसांत बेगपोरा येथे ही पाचवी चकमक आहे.
दुसरीकडे बालाकोटमध्ये पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे. सीमाभागातून गोळीबार सुरु आहे. याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले आहे. शनिवारी जम्मू-काश्मीरच्या हंदवाडा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधील चकमकीत दोन दहशतवादी ठार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर या चकमकीत लष्कराचा एक कर्नल आणि मेजरसह पाच सुरक्षा जवान शहीद झाले. यानंतर सोमवारी हंडवारा जिल्ह्यात पुन्हा एकदा सीआरपीएफच्या गस्ती पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्यात सीआरपीएफचे तीन जवान शहीद झालेत.