श्रीनगर : शुक्रवारी सकाळी जम्मू- काश्मीरच्या शोपियान भागात दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक सुरू झाली. सध्याच्या घडीलाही या परिससरात गोळीबार सुरु असून, इमाम साहिब या भागात ही घटना घडल्याचं वृत्त मिळत आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या भागात दोन- ते तीन दहशतवादी स्थानिक नागरिकांच्या घरात लपले असल्याची शक्यता आहे. या दहशतवाद्यांचा शोध घेत असताना अखेर लष्कराला यश आलं असून, एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. 




COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या २४ तासांमध्ये दहशतवादी आणि लष्करामध्ये झालेली ही तिसरी चकमक ठरत आहे. गुरुवारीही संबंधित परिसरात अशाच प्रकारच्या दोन घटना घडल्या होत्या. ज्यामध्ये दोन स्थानिकांना दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलं होतं. त्यातील एका नागरिकाची सुटका करण्यास लष्कराला यश आलं. ओलीस ठेवलेल्या दुसऱ्या नागरिकाचीही सुटका करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं म्हटलं जात आहे. ओलीस ठेवलेली दुसरी व्यक्ती ही अल्पवयीन असल्याचं म्हटलं जात आहे. 




दरम्यान, बारामुल्ला आणि परिसरात गुरुवारपासून सुरू असणाऱ्या चकमकीत बारामुल्ला येथे २, बांदीपोराच्या हाजिन भागात २ आणि शोपियानमध्ये १ अशा एकूण पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचं वृत्तही मिळत आहे.