जोधपूर : बेनामी मालमत्ता बाळगल्या प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई आणि प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणीत मोठी वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  अंमलबजावणी संचालनालय(ईडी)ने (Enforcement Directorate) राजस्थान हाय कोर्टात अर्ज दाखल केला आहे. शिवाय दाखल केलेल्या अर्जामध्ये रॉबर्ट वढेरा आणि महेश नागर यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्याची परवानगी मागितली आहे. या प्रकरणाची सुनावणी सोमवारी म्हणजे आज राजस्थान हाय कोर्टात होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे प्रकरण
अंमलबजावणी संचालनालय बीकानेर भूमी प्रकरणातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची प्राथमिक चौकशी करीत आहे. ईडी याप्रकरणी सूचना रिपोर्टचा अर्ज दाखल केल्यानंतर रॉबर्ट वाड्रा यांनी चौकशीसाठी बोलावले होते. पण 2018मध्ये त्यांनी प्रकरणाविरोधात राजस्थान हाय कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता.



सन २००७ मध्ये वढेरा यांनी स्काइलाइट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाने एक कंपनी सुरु केली होती. या कंपनीमध्ये रॉबर्ट वाड्रा आणि त्यांची आई पार्टनर होते. रॉबर्ट वाड्रा आणि मॉरीन वाड्रा यांच्या अटकेवर जोधपूर उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली होती. मात्र आता ही स्थगिती ईडी काढण्याचा प्रयत्न करत आहे.