चेन्नई : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) 200 कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी चेन्नईतील कोट्यवधी रुपयांचा बंगला आणि 16 महागड्या कार जप्त केल्या आहेत. हे सर्व सुकेश चंद्रशेखरने (Sukesh Chandrasekhar) तिहार तुरुंगात बसून केलेल्या 200 कोटींच्या खंडणीतून मिळाले होते. या प्रकरणात एजन्सीने सुकेश चंद्रशेखरची पत्नी लीना मारिया पॉलचीही (Leena Maria Paul)  चौकशी केली. लीना ही मल्यालम चित्रपटांतील अभिनेत्री आहे. तसेच 'मद्रास कॅफे' या हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे.


सुकेश चंद्रशेखर याला असे पकडले गेले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनी लाँडरिंग प्रकरणी ईडी  एका आरोपीची चौकशी करत होती, त्या दरम्यान काही फोन कॉल एजन्सीच्या ताब्यात आले. कॉलवर, सरकारी अधिकारी म्हणून बोलस असलेला एक माणूस तपास संपवण्याविषयी बोलत होता. त्यानंतर ईडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. सरकारी अधिकाऱ्याच्या नावाने येणारे फोन कॉल हे प्रत्यक्षात VoIP कॉल आहेत, असे तपासात उघड झाले.


म्हणजेच, तो कोणाचा नंबर होता, हे माहीत नव्हते, परंतु तपास चालू राहिला आणि असे आढळून आले की, हे फोन कॉल्स दिल्ली तुरुंगात बंद असलेल्या एका गुन्हेगाराकडून केले जात आहेत आणि गुन्हेगाराचे नाव सुकेश चंद्रशेखर आहे. सुकेश चंद्रशेखर यांनी जयललिता यांच्या मृत्यूनंतर AIADMK पक्षाच्या निशान निवडणूक अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्नान दिल्लीच्या रोहिणी तुरुंगात आहे.



तुरुंगात छापा टाकल्यानंतर मोठा खुलासा


गुन्हेगाराचे नाव समोर येताच. ईडीने प्रथम पीडितेशी बोलून गुन्हा नोंदवण्यास सांगितले, कारण ईडी अशा प्रकरणांची थेट चौकशी करू शकत नाही. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने तक्रार प्राप्त झाल्यावर ताबडतोब गुन्हा दाखल केला आणि सुकेशसाठी पैसे घेत असलेल्या दीपक रामदानी आणि प्रदीप रामदानी यांना अटक केली.


पोलिसांनी तुरुंगावर छापा टाकून दोन मोबाईल जप्त केले, ज्याद्वारे सगळ्यांना सुकेश फोन करत होता. त्यानंतर तुरुंगात सुकेशला मदत केल्याप्रकरणी दोन तुरुंग कर्मचाऱ्यांनाही अटकही करण्यात आली आहे.



तुरुंगात बसून काळा पैसा करत होता सफेद


चार जणांच्या अटकेनंतर स्पेशल सेलने हे प्रकरण दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवले. कारण दिल्ली पोलिसांचे EOW 200 कोटी रुपयांच्या खंडणीशी संबंधित प्रकरणाचा तपास करत आहे. 200 कोटींची ही रक्कम गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच देण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. हे सर्व पैसे रोख स्वरूपात दिले गेले आणि काही पैसे दुबई आणि हाँगकाँगलाही पाठवले गेले.


सुकेश चंद्रशेखर इतका हुशार होता की, तो तुरुंगात बसून हा काळा पैसा पांढरा करण्यात मग्न होता. या कामासाठी त्यांनी रत्नाकर बँक लिमिटेडचे ​​उपाध्यक्ष कोमल पोद्दार यांची मदत घेतली आणि त्या बदल्यात त्यांना कमिशन दिले. त्यानंतर ईडीने कोमल पोद्दारला अटक केली.


आलिशान बंगल्यात अनेक लक्झरी वस्तू


सुकेश चंद्रशेखरने या 200 कोटींमधून चेन्नईमध्ये समुद्राच्या बाजूला एक आलिशान बंगला विकत घेतला, याघरात सर्व काही लक्झरी होते. सुकेशची पत्नी लीना मारिया पॉल या घरात राहत होती, तिची सध्या चौकशी केली जात आहे.


या घरात एक होम थिएटर होते, त्यावर नावाचे इनिशियल बनवले होते. त्याने स्वत:चा रशियाचा राजा-राणीसारखे दिसणारे चित्र बनवून घेतले होते. त्याचप्रमाणे त्याच्या घरातून इतर सर्व प्रकारच्या महागड्या वस्तू मिळाल्या होत्या. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, महागड्या कपड्यांपासून ते शूजपर्यंत सर्व काही घरात होते, ज्याचा वापर सुकेश परोलवर येऊन करायचा.


तपासात एजन्सीला कळले की, सुकेश चंद्रशेखरने दुसऱ्या व्यक्तीकडून कोट्यवधी रुपयं उफळले होते. त्यानंतर त्यावर देखील दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे आणि त्याला पुन्हा चौकशीसाठी रिमांडवर घेतले आहे.


शशिकलाच्या पक्षाला AIADMK (अम्मा) पक्षाच्या 'दोन पाने' चिन्हाला शशिकलाच्या पार्टीला 50 कोटीत देण्याचा प्रयत्न केल्यामुळे सुकेश चंद्रशेखरला एप्रिल 2017 मध्ये दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली.


त्याच्या अटकेच्या वेळी, पोलिसांना 1.3 कोटी रुपये रोख मिळाले होते, जे दिनकरन यांनी पक्षाचे चिन्ह मिळवण्याच्या नावाखाली सुकेशला दिले होते. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी जुलै 2017 मध्ये आरोपपत्रही दाखल केले होते.