EPFO Latest News: जर तुम्ही सॅलरीड क्लासमध्ये मोडत असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठीच आहे. EPFO लवकरच आपल्या 7 करोड सब्सक्राइबर्सच्या खात्यांमध्ये 2022 या आर्थिक वर्षाचं व्याज ट्रांसफर करणार आहे. EPFO या वर्षी 8.1 टक्के व्याजदर देण्याच्या तयारीत आहे. एका रिपोर्ट नुसार, EPFO ने आर्थिक वर्ष 2022 मध्ये PF खात्यात मिळणाऱ्या व्याजाची मोजणी केली आहे. लवकरच, खातेदारांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (Employees Provident Fund) ने आपल्या सब्सक्राइबर्सला ई-नॉमिनेशन (epfo e-nomination) बंधनकारक केलंय. जर आपण असं केलं नाही तर तुम्हाला पीएफ बॅलेंस चेक करता येणार नाही. यामुळे खातेदाराच्या परिवाराला सोशल सिक्योरिटी मिळणार आहे. EPFO ने या संबंधी अलर्ट जारी केलंय.


ई-नॉमिनेशन असणार अनिवार्य...


 EPFO ने आपल्या सब्सक्राइबर्ससाठी नॉमिनीची माहिती देण्यासाठी नामांकनाची सुविधा दिली आहे. ज्यामध्ये ऑनलाईन नॉमिनीच नाव, जन्म तारीख यांसारखी माहिती अपडेट करता येते. EPFO ने आपल्या 
सब्सक्राइबर्सला असं सांगितलंय कि ईपीएफ खातेदारांनी ई-नॉमिनेशन (EPF/EPS Nomination) करायला हवं. असं केल्यानं खातेदाराचा मृत्यू झाल्यावर नॉमिनी/परिवाराला पीएफ, पेंशन (EPS) आणि इंशॉरन्स (EDLI) संबंधीत पैसे काढताना याची मदत होईल. जेणेकरुन, नॉमिनी अगदी सहजपणे ऑनलाईन क्लेम करु शकतो.


 7 लाख रुपयांची मिळणार सुविधा..


एम्‍प्लॉई डिपॉजिट लिंक्‍ड इंश्योरेंस स्‍कीम (EDLI Insurance Cover) मुळे EPFO मेंबर्सला इंशॉरन्स कवरची सुविधा देखील मिळते. या स्कीममध्ये नॉमिनीला 7 लाख रुपयांच्या इंशॉरन्स कवरची परतफेड 
केली जाते. जर कोणत्याही नॉमिनेशन शिवाय सदस्याचा मृत्यू झाला तर क्लेमच्या प्रोसेस करताना अडचण येते. 


असं केलं जातं EPF/EPS चं ई-नॉमिनेशन...


1. EPF/EPS nomination साठी सर्वात आधी EPFO च्या epfindia.gov.in/ या ऑफिशीअल वेबसाईटला भेट द्या.
2. त्यानंतर Services सेक्शनमध्ये FOR EMPLOYEES येथे क्लिक करा आणि त्यानंतर Member UAN/Online Service (OCS/OTCP) येथे क्लिक करा.
3. पुढे जाऊन, एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये UAN आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
4. Manage Tab नुसार E-Nomination ला सिलेक्ट करा. यामुळे तुमच्या स्क्रीनवर Provide Details टॅब येईल त्यानंतर Save येथे क्लिक करा.
5. आता फॅमिली डिक्लेरेशनसाठी Yes येथे क्लिक करा आणि पुढे जाऊन Add family details ला क्लिक करा. ( इथं तुम्ही एका पेक्षा जास्त नॉमिनी भरु शकतात.)
6. एकूण रक्कम शेअर करण्यासाठी Nomination Details येथे क्लिक करा आणि पुढे जाऊन Save EPF Nomination येथे क्लिक करा.
7. आता OTP जनरेट करण्यासाठी E-sign येथे क्लिक करा आणि पुढे जाऊन आधारशी लिंक्ड रजिस्टर्ड मोबाइल नंबरला आलेला OTP टाका.
8. असं केल्याने EPFO ई-नॉमिनेशनची तुमची प्रोसेस पुर्ण होईल. यापुढे तुम्हाला कोणतीही हार्ड कॉपी डॉक्यूमेंट पाठवण्याची गरज नाही.
 


एका पेक्षा जास्त नॉमिनी करता येतात...


पीएफ खातेदारांना एका पेक्षा जास्त नॉमिनी करता येतात. यामध्ये कोणाला किती रक्कम द्यायची हे नॉमिनेशन डिटेल्‍समध्ये भरावं लागतं. पीएफ खातेदार केवळ आपल्या कुटुंबाच्या सदस्यांनाच नॉमिनी केलं जाऊ शकतं. जर खातेदाराला कुटुंब नसेल तर दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला नॉमिनेट करण्याची परवानगी दिली जाते पण जर कुटुंबाची माहिती झाली तर त्याचे नॉमिनेशन रद्द होते.