मुंबई : लॉकडाऊन दरम्यान ईपीएफओने आपल्या कोट्यवधी खातेधारकांना एक नवी सुविधा दिली आहे. लॉकडाऊन दरम्यान येणाऱ्या अडीअडचणीत खातेदाराला तात्काळ पैसा काढता यावा, यासाठी ही सुविधा दिली आहे. आता तुम्ही तुमची जन्म तारीख अपडेट करण्यासाठी व्हॅलिट प्रुफ म्हणून आधार कार्डचा वापर करू शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी जर तुम्हाला जन्म तारीख अपडेट करायची असेल, तर वर्थ सर्टिफिकेटची गरज पडत होती. पण आता आधारकार्डच्या सहाय्याने ऑनलाईन हे काम होणार आहे. 


ऑनलाईन जन्मतारखेची दुरूस्ती करता येणार पण


विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला ईपीएफओ कार्यालयाला जाण्याची देखील गरज नाही. तुम्ही याला घरी बसून देखील अपडेट करू शकता. कामगार मंत्रालयाने रविवारी याविषयी माहिती दिली आहे. आधारकार्डच्या मदतीने ऑनलाईन जन्मतारीख अपडेट करता येणार आहे.


ईपीएफओने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, खातेधारकांना त्यांच्या जन्म तारखेत सुधारणा करायची असेल, तर आधार कार्ड एक व्हॅलिट डॉक्युमेंट म्हणून स्वीकारता येईल.


जन्म तारीख दुरूस्तीसाठी महत्त्वाची अट


सरकारने दिलेल्या माहितीनुसार या आधी नोंदवलेली जन्म तारीख दुरूस्त करण्यासाठी, नवीन जी जन्मतारीख लिहायची आहे, तिच्यात आणि पहिल्या जन्मतारखेत ज्यात तुम्हाला दुरूस्ती करायची आहे, त्यात ३ वर्षापेक्षा जास्त अंतर नको. यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.


कोरोना संकटादरम्यान खातेधारकांना ऑनलाईन पैसे काढता येणार


अडचणीत असलेल्या खातेदाधारकांना तात्काळ पैसा काढता यावा, यासाठी ऑनलाईन प्रकरणं तात्काळ निकाली काढण्याविषयीच्या सूचना ईपीएफओने क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत. कोरोनाच्या संकटात खातेधारकांना त्यांचे पैसे ऑनलाईन काढता येणार आहेत. मात्र या दरम्यान खातेधारकांना केवायसी पू्र्ण करणे अनिवार्य आहे.