मुंबई : कर्मचाऱ्यांसाठी पीएफ रक्कम ही अतिशय महत्त्वाची असते. अनेक पीएफधारक हे पीएफ खात्यातील रक्कमेचा वापर हा महत्त्वाच्या कामासाठी करतात. पीएफही वेळोवेळी पीएफधारकांसाठी योजना आणत असते. पीएफने अशीच एक योजना आणली आहे, ज्याद्वारे पीएफधारकाला एक रुपयाही न गुंतवता तब्बल 7 लाख रुपये मिळणार आहेत. या योजनेचा लाभ हा केवळ सरकारी कर्मचारी नाही, तर खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ही घेता येणार आहे.  ही योजना नक्की काय आहे, याचा लाभ कोणाला घेता येणार, याबाबत आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.  (epfo employees deposit linked insurance scheme benefits of 7 lakhs ruppes without any payment know details)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीएफकडून पीएफ आणि निवृत्ती वेतनाव्यतिरिक्त अनेक फायदे मिळतात. पण त्याबाबत आपल्याला माहिती नसते. पीएफकडून पीएफधारकांना जीवन विम्याचा लाभ देते. यानुसार पीएफधारकाला 7 लाख रुपयांचा लाभ मिळतो. यासाठी पीएफधारकाला एक रुपयाही गुंतवण्याची गरज नाही. इपीएफओने या विशेष योजनेची माहिती ट्विट करत दिली आहे.


पीएफधारकांना कर्मचारी ठेव लिंक्ड इन्शुरन्स स्कीम अंतर्गत (Employees Deposit Linked Insurance Scheme) पीएफच्या सर्व खात्यांवर मोफत विमा म्हणून 7 लाख रुपयांचा लाभ मिळतो.


दरम्यान या योजनेचा लाभ घेण्यासाठी नक्की काय करावं लागेल, हे आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात.  


- पीएफओच्या वेबसाईटवर जा. 


- वेबसाईटवर  'Services' ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा. 


- त्यानतंर 'For Employees' यावर क्लिक करा. 


- यूएएन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगीन करा.  


- लॉगीन केल्यानंतर 'मॅनेज' टॅब दिसेल. तिथे 'E-Nomination' पर्याय निवडा. 


- यानंतर पुढे Provide Details हा पर्याय दिसेल. तिथे Save दिसणाऱ्या टॅबवर क्लिक करा.


- यानंतर पुढे कुटुंबियांची माहिती द्या. इथे तुमच्या उत्तराधिकाऱ्यांची (Nominee) माहिती द्यावी लागेल.


- इथे तुम्हाला तुमच्या वारसाला किती टक्के रक्कम द्यायची आहे, याचा  देखील तिथे उल्लेख करावा लागेल. यासाठी 'Nomination Details' वर क्लिक करा.  किती टक्के रक्कम द्यायची आहे हे टाकल्यानंतर सेव्ह करा.  


- EPF नामांकन या पर्यायावर क्लिक करा.


- यानंतर तुम्हाला एक ओटीपी विचारला जाईल. हा ओटीपी मिळवण्यासाठी तुम्हाला  E sign वर क्लिक करावं लागेल. हा ओटीपी तुम्हाला आधारसह कनेट्कट असलेल्या मोबाईल नंबरवर मिळेल. 


ओटीपी मिळवण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर हा आधारसह लिंक असायला हवा.


- ओटीपी आल्यानंतर तो रिकाम्या रकान्यात भरा आणि सबमिट करा.