EPFO Interest Rate Date: पीएफधारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. पीएफधारकांच्या खात्यात 2021-22 या आर्थिक वर्षातील रक्कमेवरील व्याज येण्यास सुरुवात झाली आहे. इपीएफओने याबाबत एक पत्रक जाहीर केलं आहे. या पत्रात 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 8.1 टक्के इतकं व्याजदर (EPFO Interest Rate) ठरवण्यात आला आहे. पीएफधारकांच्या खात्यात लवकरात लवकर व्याज जमा करण्याचा इपीएफओचा मानस आहे. (epfo interest rate date know when the interest money will come in the epf account)


आर्थिक वर्ष 2020-21 मधील व्याजदर  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय विश्वस्त मंडळ आणि इपीएफओची फाइनेंस इन्व्हेस्टमेंट आणि ऑडिट कमिटीसोबत चर्चा पार पडली. या चर्चेत हा निर्णय घेण्यात आला. इपीएफओने  2020-21 या आर्थिक वर्षात 8.50 टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतला होता. पीएफ खात्यातील एकूण रक्कमेपैकी 15 टक्के रक्कम इक्विटीमध्ये गुंतवली जाते.  


वर्षनिहाय पीएफ व्याजदर


FY14 आणि FY15 मध्ये व्याज दर 8.75%
FY16 मधील व्याज दर 8.80%
FY 17 मधील व्याज दर 8.65%
FY18 मधील व्याज दर 8.55%
FY19 मधील व्याज दर 8.65%
FY20 मधील व्याज दर 8.5%
FY 21 मधील व्याज दर 8.5.%