नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे  ईपीएफओ (EPFO)मध्ये अकाऊंट असणाऱ्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे.व्याज दरात घट


PF व्याज दरात कपात 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोकरदार वर्गाला सरकार एक झटका देऊ शकते. कारण, पीएफवर मिळणाऱ्या व्याज दरात कपात केली जाण्याची शक्यता आहे. 


गेल्या २०१६-१७ या वर्षात ईपीएफओने ८.६५ टक्के व्याजदर देण्याचं घोषित केलं होतं. मात्र, चालू आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये या व्याजदरात कपात करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. 


दोन कारणांमुळे होणार घट


ईपीएफओच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रम मंत्रालयाकडून व्याजदरात कपात करण्यासंदर्भात एक अहवाल तयार केला आहे. व्याज दरात प्रामुख्याने दोन कारणांमुळे घट करण्यात येणार आहे. पहिलं कारण म्हणजे ईपीएफ खात्यात ईटीएफ (एक्सचेंज ट्रेडेड फंड) यूनिट थेट जमा करण्यात येईल. दुसरं कारण म्हणजे, ईपीएफओला गुंतवणुकीत होणाऱ्या मिळकतीत सलग घट होत आहे. त्यामुळे सध्याचा दर कायम राखणं कठीण होत आहे. 


कपात केल्यानंतर किती असेल व्याज दर?


कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने चालू आर्थिक वर्षाच्या एकूण उत्पन्नाचा अंदाज लावला नाही. याच उत्पनाच्या आधारे ईपीएफओ व्याजदर ठरवतं. मात्र, सूत्रांच्या मते यावेळीचा व्याजदर यापूर्वीच ठरवण्यात आला होता. जर चालु आर्थिक वर्षातही व्याज दरात कपात झाली तर व्याजदर स्थिर ठेवणं कठीण होईल. त्यामुळे व्याजदरात कपात होऊन ८.३० टक्के केला जाऊ शकतो. 


पाहू शकाल पीएफची रक्कम


ईपीएफओने एका नव्या पॉलिसीला मंजुरी दिली आहे. या पॉलिसीनुसार, प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी खातेधारकांच्या पीएफमध्ये ईटीएफ रक्कम क्रेडिट केली जाईल. त्यानंतर तुम्ही तुमची पीएफ रक्कम तपासु शकता. 


१ दिवसातच काढू शकता PF


दोन दिवसांपूर्वी झालेल्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टींच्या बैठकीत केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) संतोष कुमार गंगवार सहभागी झाले होते. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयामुळे आता एनपीसीआयच्या माध्यमातून पीएफची रक्कम खातेधारक एका दिवसात काढू शकणार आहे.