एस्सेलने इन्टेकला २७२ कोटींना खरेदी करण्याचा ठेवला प्रस्ताव
भारतातील एक अग्रगण्य खाजगी क्षेत्रातील कंपनी एस्सेल फायनान्स लोन्सने इंटेक कॅपिटल लिमिटेडचा 272 कोटी रुपयांचा पोर्टफोलिओ खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या करारासाठी आता बँक आणि रेगुलेटरी यांच्याकडून मंजूरीची प्रतिक्षा आहे. या करारामध्ये इन्टेक कंपनीच्या बँकेच्या कर्ज-व्यवहाराचाही समावेश आहे.
मुंबई: भारतातील एक अग्रगण्य खाजगी क्षेत्रातील कंपनी एस्सेल फायनान्स लोन्सने इंटेक कॅपिटल लिमिटेडचा 272 कोटी रुपयांचा पोर्टफोलिओ खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या करारासाठी आता बँक आणि रेगुलेटरी यांच्याकडून मंजूरीची प्रतिक्षा आहे. या करारामध्ये इन्टेक कंपनीच्या बँकेच्या कर्ज-व्यवहाराचाही समावेश आहे.
इन्टेक कंपनी आरबीआयमध्ये 'नॉन बँकिंग फायनान्स कंपनी'च्या रुपात नोंदणीकृत आहे. इंटेक मूलतः मशीन आणि लहान उद्योगांना लोन देते. त्याचबरोबर इंटेकमध्ये मोतीलाल ओसवाल प्राइवेट इक्विटीची 33 टक्के भागीदारी आहे. एस्सेल फायनांसचे मॅनेजिंग डायरेक्टर अमिताभ चतुर्वेदी यांनी म्हटले आहे की, या अधिग्रहणामुळे लोन पोर्टफोलिओ 500 कोटी रुपयांच्या वर जाईल. त्याचबरोबर संपूर्ण भारतभर मोठ्या प्रमाणात ग्राहक जोडले जातील.