मुंबई : नातं कोणतंही असो, त्याला टिकवून ठेवणं जास्त महत्वाचं असतं. यासाठी समोरील व्यक्तीबद्दल जाणून घेणं देखील गरजेचं आहे. यामुळेच नातं चांगलं टिकून राहातं. परंतु जोडीदार निवडीनं हे फार कठीण काम असतं. बऱ्याचदा मुलांना जास्त समस्या उद्भवते, कारण त्यांना मैत्रीण मिळाली तरी ती कधी काय विचार करेल हे मुलांना समजत नाही. त्यामुळे मुलांना नेहमीच असं वाटतं असतं की, त्यांना जर मुलींचं मन ओळखता आलं असतं तर किती बरं झालं असतं. मुलींना कशी मुलं आवडतात, त्याबद्दल त्या कधीच कोणाला सांगत नाहीत आणि मनात गुपित ठेवतात. जर मुलांना हे रहस्य माहित असेल, तर ते कोणत्याही मुलीशी चांगले बॉन्डिंग करू शकतात. जर तुम्हाला कोणाशी मैत्री करायची असेल तर आधी ती काय विचार करते हे तुम्हाला माहित असायला हवं.


1. अशी मुलं मुलींना आवडतात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असे म्हटले जाते की, मुलींना डोळ्यात डोळे घालून बोलणारी मुलं फार आवडतात. याचे कारण असे आहे की, जे मुलं डोळ्यात बघून बोलतात त्यांच्यात जास्त आत्मविश्वास असतो. परंतु जर मुलगा इकडे तिकडे पाहून बोलत असेल तर, मुलींना हे जाणवतं की, मुलं माझ्यामध्ये इंट्रेस्टेड नाही.


2. जजमेंटल मुलं आवडत नाहीत


मुलींना जजमेंटल मुले अजिबात आवडत नाहीत, ज्याची मुलांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. आजच्या काळात, मुलींनी हे करू नये, ते करू नये इत्यादी कोणत्याही गोष्टीबद्दल मुलं जर मुलींना बोलली तर मग मुलींना अशी मुलं अजीबात आवडत नाहीत. त्यामुळे असं कधीही तुम्ही मुलींसमोर बोलू नका.


3. मुलींना सरप्राईज आवडतात


मुलींना सरप्राईज खूप आवडतात. त्यामुळे जो मुलगा त्यांना जास्त गिफ्ट देईल त्यांच्याकडे मुली जास्त खेचल्या जातात. तुम्ही कोणत्याही मुलीला पाहिल्यांदा भेटायला जात असाल, तर तिला गिफ्ट घेऊन जा.


4. मजा-मस्ती करणारे मुलं आवडतात


मुलींना अशा मुलांशी मैत्री करायला आवडते. जी मुलं मजा-मस्ती करत आयुष्य जगत असतील. ज्याच्या चांगला सेन्स ऑफ ह्युमर असेल आणि तो कोणतीही गोष्ट जास्त सिरियस घेणार नाही. त्यामुळे शक्यतो मुलींना तुमचे प्रॉबलम्स सांगू नका. तुम्ही जर त्यांना भेटल्यावर तुमच्या आयुष्यातील नेगेटीव्ह गोष्टींबद्दल बोलाल. तर मुली तुमच्याकडे दुर्लक्ष करतील.


5. रिस्पेक्ट देणारी मुलं आवडतात


मुलींना अशी मुलं आवडतात जी त्यांना इज्जत देतील आणि कोणत्या ही गोष्टीसाठी त्यांचं मत विचारात घेतील. त्यामुळे मुलींशी नम्रतेनं बोला आणि कोणत्याही गोष्टीत त्यांना गृहीत धरु नका


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)