Trending News : कामानिमित्त आणि फिरायला विदेशात असंख्य लोक भारतातून विमानद्वारे जात असतात. भारतीयांसाठी दुबई हे फिरण्याचं आणि कामासाठी महत्त्वाचा देश आहे. लोक दुबईला कुठल्या ना कुठल्या कारणाने जात असतात. पण गुजरातमधील सुरतमधील या घटनेने सर्वांना धक्का बसलाय. सुरत विमानतळावरुन एक महिला दर महिना दुबईला जात होती. गेल्या चार महिन्यापासून महिलेची दुबई वारी सुरु होती. विमानतळावरील तिची हालचाल आणि वावर पाहता सीमा शुल्क आणि महसूल गुप्तचर संचालनालय म्हणजेच सीआयएसएफला तिच्यावर संशय आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीआयएसएफने जेव्हा तिला पुन्हा सुरत विमानतळावर पाहिले तेव्हा तिला अडवलं आणि तिची चौकशी करायला सुरुवात केली. त्यावेळी तिला सीआयएसएफच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं देता आली नाही. त्यानंतर जे घडलं ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. तस्करी करण्यांना गजाआड करण्यासाठी विमानतळावर ॲडव्हान्स्ड पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम बसवण्यात आली होती. या सिस्टीमच्या माध्यमातून कोणत्या प्रवाशाने किती वेळा, कुठल्या देशात प्रवास केला याची संपूर्ण माहिती मिळतं. याच आधारावर त्या महिलेवर सीआयएसएफला संशय आला होता. 


7 जूनला महिला नेहमीप्रमाणे विमानतळावर आली...


धानीमनी काही नसताना नेहमीप्रमाणे 7 जूनला ती दुबईहून सुरत विमानतळावर उतरली तेव्हा तिला रोखण्यात आलं. दुबईच्या ट्रिपबाबत तिला कोणतंही समाधानकारक उत्तर देता आलं नाही आणि शिवाय ती घाबरली. म्हणून तिचा एक्स रे काढण्याचा निर्णय घेण्यात आला. पण महिलेने एक्स रे करण्यास नकार दिला. शेवटी तिला कोर्टात सादर करुन वैद्यकीय तपासणीची मागणी करण्यात आली. कोर्टाने वैद्यकीय तपासणीची परवानगी दिल्यानंतर जे धक्कादायक प्रकार समोर आला त्यानंतर सगळे हादरले. 


एक्स-रे रिपोर्ट काय निघालं?


एक्स-रे रिपोर्टमध्ये महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये दोन कॅप्सूल होतं ज्यामध्ये सोनं होतं. ही महिला दुबईला जाऊन सोन्याची तस्करी करत होती. तिच्याजवळ 550 ग्रॅम सोनं मिळालं ज्याची किंमत 41 लाख रुपये होती. या प्रकरणात महिलेची कसून चौकशी सुरु असून यात कोणा कोणाचा सहभाग आहे तपासले जातेय. 


सोन्याच्या तस्करीत दिवसेंदिवस वाढ


सोन्याच्या किमतीत वाढ झाल्यामुळे काही वर्षांमध्ये सोने तस्करीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. इतर देशांतून बेकायदेशीररीत्या स्वस्तात सोनं आणण्यासाठी तस्कर रोज नवनवीन पद्धती शोधून काढत आहेत.  सुरत ते दुबई आणि शारजाहसाठी उड्डाणं सुरू झाल्यानंतर सोन्याच्या तस्करीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं सीआयएसएफ सांगतात. गेल्या दीड वर्षात सुरत विमानतळावरून तस्करी केलेलं 37 कोटी रुपयांचं सोनं जप्त करण्यात आलंय.