हरियाणा : २४ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणूक २०१९ चा निकाल जाहिर झाल्यानंतर आज हरियाणात मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आला. भारतीय जनता पार्टी (भाजप) आणि जननायक जनता पार्टी (जेजेपी) यांच्या १० मंत्र्यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यामध्ये भारताच्या माजी कर्णधाराचा देखील समावेश आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपाच्या वतीनं निवडून आलेल्या हॉकी स्टार संदीप सिंगला राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. त्याच्याबद्दल महत्तवाचं सांगायचं झालं तर, कर्णधार असताना त्यांच्या पायाला एका जवानाकडून गोळी लागली होती. या अपघातामुळे तो व्हिल चेअरवर होता. 


शिवाय त्याला काही काळासाठी हॉकी खेळाला देखील रामराम ठोकावा लागला होता. तीन वर्षांसाठी तो पॅरालाईज झाला होता. संदीपच्या या कथेवर चित्रपट देखील साकारण्यात आला होता. २७ फेब्रुवारी रोजी हरियाणातील कुरुक्षेत्र येथे जन्म घेतलेल्या संदीपने २००४ रोजी हॉकीत पदापर्पण केलं होतं. 


शताब्दी एक्सप्रेसनं दिल्लीला जात असताना एका जवानाच्या बंदुकीतून गोळी झाडली गेली. ती गोळी त्याच्या पायाला लागल्यामुळे त्याच्या खेळात ३ वर्षांचा खंड पडला. त्यानंतर २००८ साली तो पुन्हा हॉकीच्या मैदानात उतरला.