नवी दिल्ली : संविधानात दिलेल्या न्याय, स्वतंत्रता, समानता आणि बंधुतेच्या मुळ सिंद्धाताचे रक्षण करा असे आवाहन माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देशाला केले आहे. मुखर्जी यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न दिल्याची घोषणा प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला करण्यात आली होती. 70 व्या प्रजासत्ताक दिनी शुभेच्छा देत संविधानाच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी देशवासिंयांचे केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


भारतीय प्रजासत्ताकास 70 वे वर्षे पूर्ण झाले आहे. मी भारत आणि विदेशातील प्रत्येक भारतीय नागरिकाला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. या महान लोकतंत्राचा पाया आमच्या भारतीय संविधानातून राष्ट्र निर्मात्यांनी रचल्याचे मुखर्जी म्हणाले. त्यांनी मध्य दिल्लीतील आपल्या राहत्या ठिकाणी राष्ट्रध्वज फडकावला. यावेळी तिथे सीआरपीएफची तुकडीने राष्ट्रध्वजाला सलामी दिली. 



'आमच्या राष्ट्र निर्मात्यांनी या संदर्भात आमचे मार्गदर्शन केले आहे. आपल्या स्वप्नातील भारत साकारण्यासाठी अधिक उत्साहात पुढे जाऊया. या प्रजासत्ताक दिनी आपण संविधानाच्या आदर्शांवर पुढे जाण्याचा संकल्प करुया' असे त्यांनी पुढे म्हटले. 



केंद्र सरकारतर्फे शुक्रवारी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, प्रसिद्ध संगीतकार-गायक भूपेन हजारिका आणि आरएसएसशी संबधित नेता तसेच समाजसेवक नानाजी देशमुख यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' देण्याची घोषणा केली होती.