नवी दिल्ली : कोरोनाव्हायरस (Coronavirus) साथीच्या आजाराच्या वाढत्या घटनांमध्ये वाढ होत असताना जगात आणखी एका आजाराने दार ठोठावले आहे. या आजाराची तीव्रता पाहून वैज्ञानिक देखील चक्रावले आहेत. संशोधकांना हिंद महासागरात अंदमान बेटांवर (Andaman Islands) कॅन्डिडा ऑरिस किंवा सी नावाचा (Candida Auris or C) बुरशीचा एक प्रकार सापडला आहे. यासंदर्भातील एक अभ्यास जर्नल mBio मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. यामुळे देशात आणखी एक प्राणघातक आजाराचा धोका वाढला आहे. हा आजार मानवी संसर्गाने पसरत असल्याने महामारीचे (Pandemic) रुप घेऊ शकतो ही भीती संशोधकांना वाटतेय. 


अतिशय धोकादायक 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅन्डिडा ओरिस किंवा 'सी' अधिक धोकादायक आहे. कारण बहुतेक अँटीफंगल औषधांचा (Antifungal Drugs) यावर कोणताही परिणाम होत नाही. २०१० च्या सुरूवातीस तीन खंडांवर मानवी रोगजनक म्हणून उदयास आला. ही बुरशी अनेकदा ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असते, त्यांना नुकसान पोहोचवते. लाइव्ह सायन्सच्या अहवालानुसार, कोरोना साथीने या प्राणघातक बुरशीचा प्रसार होण्यास वातावरण तयार केले आहे. हा रोग एखाद्या साथीच्या रोगाची जागा घेईल अशी भीती व्यक्त केली जातेय.



दिल्ली विद्यापीठाच्या वैद्यकीय मायकोलॉजिस्ट डॉ. अनुराधा चौधरी (Dr Anuradha Chowdhary)आणि त्यांच्या पथकाने यावर अभ्यास केला. अंदमान द्वीप समूहाच्या आठ ठिकाणी 48 माती आणि समुद्री पाण्याच्या नमुन्याचे संशोधन केले. यावेळी त्यांनी दोन ठिकाणी 'सुपरबग्स' ओळखले. एक म्हणजे सॉल्ट मार्श वेटलँड, जिथे जवळजवळ कोणीही जात नाही आणि दुसरा एक समुद्रकिनारा आहे जेथे खूप गर्दी असते. डॉ. चौधरी यांच्या पथकाने केलेल्या संशोधनात असे आढळले की, मध्यभागी सापडलेला 'सुपरबग' इतरांपेक्षा मल्टी ड्रग रेसिस्टंट होता. हा महामारीचे रुप घेऊ शकतो अशी भीती वैज्ञानिकांना वाटतेय. असे झाल्यास जगणे कठीण होईल.DNA ने यांदर्भात वृत्त दिले आहे.


मानवी संपर्काने पसरतो


कॅन्डिडा ऑरिसची उत्पत्ती नैसर्गिकरित्या अंदमान बेटांवर झाली आहे किंवा तिथे कुठून पोहोचला आहे याबद्दल अभ्यासात स्पष्ट झाले नाहीय. या बुरशीने जगाच्या बर्‍याच भागात आपली जागा निर्माण केलीय. आणि बर्‍याच जणांच्या मृत्यूंना कारणीभूत देखील ठरली आहे.  याच्या संसर्गाचा वेग लक्षात घेता, वैज्ञानिक मानतात की, कॅन्डिडा ऑरिस मानवी संपर्काने कोरोनासारखे पसरते.


सीडीसी (CDC)चा इशारा


अमेरिकेच्या रोग नियंत्रण केंद्र (CDC)च्या म्हणण्यानुसार, हा सूक्ष्मजंतू गंभीर रक्तप्रवाह संक्रमणाचे कारण बनू शकतो. विशेषत: ज्या रुग्णांना कॅथेटर, फीडिंग ट्यूब किंवा श्वसन नलिकेचे आजार असतात अशा रुग्णांमध्ये गंभीर रक्तस्राव होऊ शकतो. लाइव्ह सायन्स रिपोर्ट्सनुसार या संसर्गावर उपचार करणे अवघड आहे, कारण बर्‍याचदा अँटीफंगल औषधे सूक्ष्मजंतूवर परिणाम करीत नाहीत आणि ते वातावरणात बराच काळ टिकू शकतात. या बुरशीसंबंधित केसेस अमेरिका, युरोपमध्येही समोर आली आहेत. भारत, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकामध्येही हे आढळू शकते असंही म्हटलं जातंय.