Ration-Aadhaar Cards Link : आता तुम्हाला रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी मुदत मिळाली आहे. तुम्ही जर दोन्ही कार्ड एकमेकांना लिंक केली नसतील तर तात्काळ करा. तुमचे रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख 30 जून होती. परंतु केंद्र सरकारने आता तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे तुमच्या हातात खूप वेळ आहे. तुम्ही  रेशन आणि आधार कार्ड लिंक केले नसेल तर करुन घ्या. अन्यथा धान्य मिळण्यास अडचण येऊ शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेशन आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी आता 30 सप्टेंबर2023 पर्यंत मुदत वाढवली आहे.अंतोदय अन्न योजनेअंतर्गत लाभ मिळवणाऱ्यांसाठी आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य आहे. तुमचे आधार आणि रेशन कार्ड लिंक करण्यासाठी, तुम्हाला मोफत सेवेचा लाभ घेण्यासाठी स्थानिक शिधावाटप कार्यालयात जावे लागेल. 


सरकारने आधारशी लिंक करणे अनिवार्य केले आहे. कारण यामुळे वापरकर्त्यांकडे एकापेक्षा जास्त रेशनकार्ड ठेवण्यास लगाम लागणार आहे. तसेच काही लोकांचे उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त असले तरी काही जण रेशनचा लाभ उठवत आहेत. रेशन आणि आधार कार्ड लिंक झाले तर त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासही अधिकाऱ्यांना मदत होईल.


रेशनकार्ड हे लोकांना सवलतीच्या दरात धान्य मिळण्यासाठी असते आणि त्यांचा ओळखीचा पुरावा म्हणून महत्त्वाचा दस्तऐवज म्हणूनही वापर करता येतो. लोकांकडे दोन किंवा अधिक शिधापत्रिका आहेत आणि ते वेगवेगळ्या ठिकाणांहून अनुदानित दराने रेशन घेत आहेत. पांढरे कार्ड धारकांनी प्रथम त्यांचे रेशन कार्ड डिजीटल करणे आवश्यक आहे आणि नंतर ते त्यांचे कार्ड आधारशी लिंक करु शकतात.


एका सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्र राज्यात 24.4 लाख लोकांना अंतोदय अन्न योजनेअंतर्गत समाविष्ट केले आहे. गरीब कुटुंबांना अनुदानावर अन्न मिळते. महाराष्ट्रात किमान 2.56 कोटी शिधापत्रिकाधारक आहेत. अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे की, ज्यांच्याकडे पांढरे कार्ड आहेत त्यांनी डिजिटायझेशन करणे आणि नंतर त्यांचे कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. मात्र, तुमची पांढरी कार्ड आधारशी लिंक करणे बंधनकारक नसणार आहे.


तुम्ही तुमचा आधार तुमच्या रेशन कार्डशी ऑनलाइन लिंक करु शकता. या स्टेप्स प्रमाणे तुम्ही ते करु शकता.


food.wb.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.


आवश्यक तपशील भरा: आधार कार्ड क्रमांक, शिधापत्रिका क्रमांक आणि तुमचा नोंदणीकृत मोबाइल.


‘continue’ वर क्लिक करा.


तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावर एक OTP क्रमांक मिळेल


OTP एंटर करा आणि तुमचे रेशन आणि आधार लिंक करा.


भारतात राज्य सरकार राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत अनुदानित दराने अन्नधान्य खरेदी करण्यासाठी पात्र लोकांना रेशन कार्ड जारी करते. अनेक लोकांसाठी शिधापत्रिका ओळखीचा पुरावा म्हणूनही काम करतात.