नवी दिल्ली : #MeToo मोहिमेमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे. अकबर यांनी आपल्यावर झालेले लैंगिक शोषणाचे आरोप फेटाळलेत. आरोप झाले त्यावेळी ते परदेश दौऱ्यावर होते. आज नवी दिल्लीत परतल्यानंतर अकबर यांना विमानतळावरच पत्रकारांनी गाठलं... मात्र त्यावेळी त्यांनी कोणतंही भाष्य करण्यास नकार दिला. त्यानंतर काही तासांनी एक पत्रक काढत त्यांनी आपल्यावर झालेले सर्व आरोप फेटाळले.


'खोटे आणि बिनबुडाचे आरोप'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपली प्रतिमा मलीन करण्यासाठी खोटे आणि बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचं अकबर यांचं म्हणणं आहे. निवडणुक वर्षामध्ये हे आरोप करण्यामागे छुपा उद्देश असल्याचा त्यांचा दावा आहे.


चौकशीचं आश्वासन


#MeToo मोहिम सुरू झाल्यापासून अकबर यांच्यावर ९ महिला पत्रकारांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप केलाय.


या आरोपांची भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी दखल घेत चौकशीचं आश्वासन दिलंय. तर विरोधकांनी अकबर यांच्या राजीनाम्याची मागणी केलीये.


काय प्रकरण ?


काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर महिला पत्रकारांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. तेव्हापासून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याचा मुद्दा लावून धरला होता. मात्र, एम.जे. अकबर परदेश दौऱ्यावर असल्यामुळे त्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतरच याबाबतचा अंतिम निर्णय घेऊ, असे भाजपचे म्हणणे होते.


पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी त्यांच्यावरील आरोपांची चौकशी करू, असे आश्वासनही दिले होते. 


या पार्श्वभूमीवर त्यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. ते रविवारी सकाळीच भारतात परतले. ते विमानतळावर येताच माध्यम प्रतिनिधींनी त्यांची या आरोपांबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला.


मात्र, त्यांनी आपण लवकरच याबाबत स्पष्टीकरण देऊ, असे सांगत तेथून काढता पाय घेतला होता.