मुंबई : Extra Marital Affair News:मोबाईल फोन लोकांच्या जीवनात खूप महत्वाची बाब झाली आहेत. एका क्षणात आपण आपल्या प्रियजनांपासून दूर बसून आपल्या नातेवाईकांशी बोलू शकतो. आता व्हिडिओ कॉल देखील करणे शक्य झाले आहेत, ज्यामध्ये दोन लोक एकमेकांना पाहिल्यानंतर बोलू शकतात. तथापि, अनेक प्रसंगी, मोबाईल फोनमुळे अनेक मतभेद उघड होऊ लागले आहेत. बऱ्याचदा आपल्याला असे प्रकरण पाहायला आणि ऐकायला मिळते की पत्नीला नवऱ्याच्या अफेअरची माहिती त्याच्या मोबाईलवरुन मिळाली आहे. असाच एक बाका प्रसंग उघड झाला आहे. त्यानंतर पत्नीने टोकाचे पाऊल उचलले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असेच एक प्रकरण हरियाणातील जिंदमधून समोर आले आहे. तथापि, त्याचा शेवट खूप दु:खदायक आणि वेदनादायक झाला आहे. पतीच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या महिलेचा फोटो पाहून तिला धक्का बसला आणि पतीच्या कथित अनैतिक संबंधांमुळे वैतागलेल्या पत्नीने विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या (committed suicide) केली. (Extra Marital Affair: Wife saw neighbor's photo in husband's mobile, then wife committed suicide)


या प्रकरणी पीडितेच्या भावाच्या तक्रारीवरुन शहर पोलीस स्टेशन सफिडॉन पोलिसांनी तिचा पती, शेजारच्या महिलेसह चार जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या पत्नीने (बहिणीने) पतीच्या मोबाईलमध्ये शेजारणीचे फोटो पाहिल्यानंतर तिला मोठा धक्का बसला. तिचा भाऊ यांनेही सांगितले की, बहिण्याच्या नवऱ्याचे अनैतिक संबंध होते, म्हणून माझ्या बहीणने आत्महत्या केली आहे. या आत्महतेस  तिचा पती कारणीभूत आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुंदरलालची 38 वर्षीय पत्नी हिला 21 ऑगस्ट रोजी पीजीआय रोहतक येथे उपचारासाठी नेण्यात आले, तिथे तिचा काल रात्री मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, मृताचा भाऊ बलराजच्या मते, त्याच्या बहिणीचे लग्न 2005मध्ये राडा मोहल्ला येथील रहिवासी सुंदरलालसोबत झाले होते.


लग्नानंतर सासरचे लोक हुंड्याची मागणी करायचे. त्याच वेळी, सुंदरलालचे शेजारच्या एका महिलेशी अवैध संबंध होते.या प्रकरणावरून घरात वाद झाला. पोलिसांनी सांगितले की, दाखल केलेल्या तक्रारीनुसार पत्नीने 21 ऑगस्ट रोजी तिच्या पतीच्या फोनमध्ये शेजारच्या महिलेचा फोटो पाहिले.


या प्रकरणावरुन सुंदरलाल आणि पत्नी यांच्यात बाचाबाची झाली आणि त्यानंतर पत्नीने विषारी पदार्थ खाऊन आत्महत्या केली. शहर पोलिस स्टेशन सफिडॉनचे तपास अधिकारी भूपेंद्र यांनी सांगितले की, मृताच्या भावाच्या तक्रारीच्या आधारावर चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु करण्यात आला आहे.