अनैतिक संबंधाचा संशय; विवाहित महिलेसह तरूणाची काढली धिंड, पाहा VIDEO
विवाहबाह्य संबध; विवाहित महिला आणि तरूणासोबत गावकऱ्यांनी जे केलं ते पाहून तुम्हाला मोठा धक्का बसेल, VIDEO पाहिलात का?
खगरीया : देशभरात विवाहबाह्य संबंधांच्या प्रकरणामध्ये खुप मोठी वाढ होत चालली आहे. याच संबंधांमुळे आता शेकडो कुटूंब उद्ध्वस्त होतातय. या वाढत्या प्रकरणामुळे विवाहीत महिलेच्या चारीत्र्यावर संशय घेणारी प्रकरणेही वाढली आहेत. अशाच एका संशयाच्या प्रकरणात ग्रामस्थांनी मिळून गावातील विवाहीत महिला आणि तरूणांची धिंड काढल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. नेमकं या घटनेत काय घडलंय ते जाणून घेऊयात.
गावातील महिलेच्या घरी ती एकटी असताना एक तरूण आला होता. गावातील काही गावगुंडाना या घटनेची माहिती मिळताच. या गावगुंडानी महिलेच्या घरावर धाड टाकत दोघांना घराबाहेर काढले. तरूणाचे संपुर्ण कपडे उतरवून विवाहित महिलेस त्यांची गावभर धिंड काढण्यात आली. या घटनेनंतर दोघांनाही गावातल्या एका मध्यभागी बसवण्यात आले. यानंतर तरूणाचे गावगूंडानी अर्धटक्कल केलं. तसेच या दोघांनाही गावगुंडांकडून बेदम मारहाण करत अश्लील शिवीगाळही करण्यात आली. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल केला. बिहारमधील खगरिया येथे ही घटना घडलीय.
विवाहित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, गावगुंडांनी मारहाण केल्यानंतर तिच्या पतीच्या मित्राला अर्धनग्न केले आणि त्याचं अर्धटक्कल करून त्याला गावात फिरवले. इतकं करून सुद्धा त्यांचं मन भरले नसल्याने त्यांनी त्याला बेदम मारहाण केली. तसेच तिच्यावर अनैतिक संबंधाचा आरोप करण्यात आल्याचे ती सांगते.
याप्रकरणी भरतखंड पोलिस ठाण्याचे प्रमुख आशुतोष कुमार यांनी सांगितले की, याप्रकरणी एका तरुणाला आधीच अटक करण्यात आली होती, तर दुसऱ्या तरुणाला रात्री उशिरा अटक करण्यात आली. उर्वरित चार जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल.
दरम्यान या घटनेत अद्याप तरी पोलिसांनी दोघांमध्ये विवाहबाह्य संबंध होते याची माहिती दिली नाही आहे. गावगुंडांचा हा निव्वळ आरोप होता व त्यांना छळ करायचा होता, हे या घटनेतून दिसून आलंय.