मुंबर्ई : परीक्षांचा मोसम संपल्यानं उन्हाळी सुट्ट्यांची लगबग सगळीकडे पाहायला मिळतेय. याच पार्श्वभूमीवर गावी आणि पर्यटनस्थळी जाणाऱ्यांची गर्दी वाढू लागलीय. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने पन्नास मेल आणि एक्स्प्रेस गड्यांवा जादा डबे जोडण्याचे जाहीर केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर भारत, कोकण, गोवा, कर्नाटकात जाणाऱ्या गाड्यांना हे जादा डबे जोडले जाणार आहेत. त्यामुळे जवळपास दहा हजार अतिरिक्त प्रवाशांची सोय होणार आहे. 


उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यानंतर आता गावी जाण्यासाठी गर्दी वाढते आहे. एप्रिल अखेरीस सलग चार दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे तर कोकण आणि गोव्याला जाणाऱ्या सगळ्या एक्सप्रेस फुल्ल झाल्या होत्या. पहाटेची वेळेत सुटणाऱ्या गाड्या तसेच अधिक तिकीट दर असलेल्या डबलडेकर, तेजस एक्स्प्रेसमधील या काळातील प्रतीक्षा यादीही वाढल्याचंही रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आलं होत. शनिवार, २८ एप्रिल ते १ मे या कालावधीतील तेजस एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, एलटीटी-मडगाव डबलडेकर एसी, कोकणकन्या, तुतारी एक्स्प्रेस आदी गाड्यांचे आरक्षण फुल्ल झालं होतं. यामुळेच रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय.