मुंबई  : टेक्सटाईल्स कंपनीला एका जाहिरातीमुळं नेमका किती फटका पडू शकतो, याची प्रचिती आता येत आहे. दिवाळी किंवा सहसा सणवारांचे दिवस जवळ आले की अनेक ब्रँडकडून ग्राहकांसाठी सवलती दिल्या जातात. यासाठी जोरदार जाहिरातबाजीही करण्यात येते. पण हीच जाहिरातबाजी एका बड्या ब्रँडला महागात पडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Fabindia या ब्रँडला मोठ्या प्रमाणात अनेकांच्याच रोषाला सामोरं जावं लागत आहे. ‘Jashn-e-Riwaaz’ या नावानं फॅबइंडियाच्या नव्या कलेक्शनला सर्वांच्याच भेटीला आणण्यात आलं पण, दसऱ्यानंतर आणि दिवाळीच्या आधी या ब्रँडनं जाहिरातीला उर्दू टच देणं फॅबइंडियाला महागात पडलं आहे. 


जाहिरातीच्या या ट्रीकला होणारा विरोध पाहता, लगेचच कंपनीकडून त्यांचं हे नवं कँपेन सोशल मीडियावरुन मागे घेण्यात आलं. 'झिलमिल सी दिवाली, या नावाचं आमचं दिवाळी कलेक्शन अद्यापही लाँच झालेलं नाही. आम्ही फॅब इंडियामध्ये कायमच देशातील सर्व धर्माचे उत्सव, रुढी परंपरा साजरा करण्याला प्राधान्य दिलं आहे. आम्ही आमच्या नावातूनच भारताप्रती समर्पक आहोत हे सिद्ध होतं. सध्याची ‘Jashn-e-Riwaaz’ ही टॅगलाईन म्हणजे देशातील संस्कृतींचा उत्सव असाच आहे', असं या ब्रँडच्या प्रवक्त्यांकडून स्पष्ट करण्यात आलं. 








फॅब इंडियाकडून देण्यात आलेल्या या स्पष्टीकरणानंतरही ट्विटरवर या ब्रँडवर बंदी घालण्याचीच मागणी सातत्यानं करण्यात येत होती. मुोळात बरेच मीम्सही व्हायरल करत ‘Jashn-e-Riwaaz’ या कॅम्पेनचा विरोध करण्यात येत होता.