मुंबई : आंबा हा फळांचा राजा आहे. परंतु तुम्हाला माहितीय त्याला फळांचा राजा असंच म्हटलं जात नाही. आंबा इतका रसाळ आणि चवदार असतो की, त्याला खाण्याचा मोह कोणीही रोखू शकत नाही. आपल्या देशात आंब्याच्या 1500 पेक्षा जास्त प्रकार आहेत. जगात सर्वाधिक म्हणजेच 25 दशलक्ष टन आंब्याचे उत्पादन फक्त भारतातच होते. त्यापाठोपाठ इंडोनेशिया, चीन, मेक्सिको आणि पाकिस्तानचा क्रमांक लागतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उन्हाळ्यात आंबा येतो. त्यामुळे आपल्याला त्या सिझनमध्ये मोठ्या प्रमाणावर आंबा खायला मिळतो. मग तो फक्त आंबा असो किंवा त्याच्यापासून तयार होणारी मिठाऊ, शेक किंवा केक. आंबा हा सगळ्याच लोकांचा जवळचा विषय आहे. त्यामुळे अशी फार अशी कमी लोक असतील, ज्यांना आंबा आवडत नसावा.


परंतु तुम्हाला आवडणाऱ्या आंब्याबद्दल तुम्हाला फारशी माहिती नसावी. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला याच्याशी संबंधीत काही माहिती सांगणार आहोत.


ऑगस्टपर्यंत बाजारपेठेत आंब्याचे आपल्या वेगवेगळे प्रकार पाहायला किंवा खायला मिळतात. परंतु तुम्हाला माहितीय आंब्याचा खरा हंगाम हा मार्च-एप्रिलपासून सुरू होतो.  यादरम्यान रत्नागिरी, हापूस, मालगोवा, सफेदा, सिंदूरी, दसऱ्याला आंबा बाजारात पोहोचू लागतो.


आंब्याच्या हंगामाच्या शेवटी केरळ आणि कर्नाटकमध्ये नीलम आंबा पिकतो.


आंब्यांमध्ये अल्फोन्सो हा असा आंबा आहे, ज्याची सर्वाधिक निर्यात केली जाते. हा महाराष्ट्रात पिकवला जाणारा आंबा आहे. गोडपणा, चव आणि सुगंध या बाबतीत तो इतर आंब्यांपेक्षा वेगळा आहे. हेच कारण आहे की, बाजारात या आंब्याला जास्त मागणी आहे.


विशेष म्हणजे हा आंबा पिकला तरी देखील आठवडाभर खराब होत नाही. त्यामुळे त्याची अधिक निर्यात होते. इतर आंब्यांपेक्षा त्याची किंमत जरा जास्त असते.


आता प्रश्न हा उपस्थीत होतो की, जर आपण कच्चा आबां म्हणजे, ज्याला आपण कैरी बोलतो, ती जर आपण खाल्ली तर ती चवीला आंबट असते, मग आंबा पिकल्यानंतर आपल्याला गोड कसा काय लागतो? वास्तविक, आंबा कच्चा असताना त्यात आम्ल जास्त आणि साखर कमी असते. जसजसे त्याचे फळ पिकते तसतसे आम्ल कमी होते आणि नैसर्गिक साखर वाढते. त्यामुळे ते पिकल्यावर गोड लागतात.


तुम्ही चौसा आंबा कधी ना कधी खाल्लाच असेल, त्याचे नाव इतके वेगळे का? याचीही एक कथा आहे. वास्तविक, 1539 मध्ये शेरशाह सूरीने बिहारमधील चौसा येथे झालेल्या युद्धात हुमायूनचा पराभव केला होता. या विजयाच्या आनंदात शेरशाहने आपल्या आवडत्या आंब्याचे नाव चौसा असे ठेवले. तेव्हापासून याच नावाने त्या आंब्याला ओळखले जाते. मात्र, या आंब्याचा उगम उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात आहे.