मुंबई : दररोज बिनकामाचे असंख्य मेसेज आपल्याला येत असतात. पण, या मेसेजना वाचण्याचीही आपण तसदी घेत नाही. 'कंपनीचा मेसेज आहे', असं म्हणत आपण या मेसेजकडे दुर्लक्ष करतो. पण, आता मात्र तसं करु नका. कारण, तुमच्या इनबॉक्समध्ये सरकारी योजनेअंतर्गत 2.67 लाख रुपये मिळणार असल्याचा एखादा मेसेज आलेला असू शकतो. त्याकडे दुर्लक्ष करु नका. अहो, कारण या मेसेजनुसार तुमच्या खात्यात मोठी रक्कम क्रेडिट करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे या व्हायरल मेसेजचं सत्य? 
तुम्हालाही 2.67 लाख रुपये खात्यात जमा झाल्याचा मेसेज आला असेल तर हुरळून जाऊ नका. आताच सावध व्हा. पीआयबीच्या सांगण्यावरून सरकारी योजनेच्या नावाखाली हा फसवा मेसेज प्रचंड व्हायरल होत आहे. या माध्यमातून तुमच्या खात्यावर डल्ला मारला जाऊ शकतो. (Fact Check Govt Scheme Bank account message fake ping  PIB )


चुकूनही लिंकवर क्लिक करु नका 
व्हायरल होणाऱ्या या मेसेजसोबत एक लिंकही तुम्हाला मेसेजमधून येत असेल. पण, या लिंकवर अजिबातच क्लिक करु नका. लिंकवर चुकूनही क्लिक केल्यास मोठी फसवणूक होऊ शकते.



फसवे मेसेज व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही 
असे मेसेज व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापुर्वीही असे बरेच मेसेज व्हायरल झाले आहेत. पण, अशा मेसेजमुळं सर्वसामान्यांची फसवणूक होऊ नये, या एकाच कारणाने  (PIB Fact Check) पीआयबीकडून मात्र नेमकं चित्र सर्वांसमोर आणलं जात आहे.