मुंबई :  सध्या सगळीकडे जोरदार पाऊस पडतोय. राज्यात अनेक भागात पूरस्थिती आहे. अशातच पुराच्या पाण्यात शेषनागावर विराजमान असलेली भगवान विष्णूची मूर्ती अवतरल्याचा व्हीडिओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतोय. नेमका काय आहे हा सगळा प्रकार, यामागचं सत्य झी 24 तासने शोधून काढलंय. (fact check idol of lord vishnu appeared in the flood know what true what false)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही रामायण, महाभारत सीरियल पाहताना अनेकदा शेषनागावर विराजमान असलेले भगवान विष्णू पाहिले असतील. पण प्रत्यक्षात कधी पाण्यावर तरंगणारी अशी विष्णूमूर्ती पाहिलीय का ? आता हे दृश्य पाहा...पाण्यात चक्क भगवान विष्णूची मूर्ती पाहायला मिळतीय. ती देखील शेषनागावर विराजमान असलेली.


सोशल मीडियात हा व्हिडिओ अतिशय वेगानं व्हायरल होतोय. राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहतायेत. त्यामुळे हा व्हीडिओ महाराष्ट्रातील असल्याचाही दावा केला जातोय. हा लोकांच्या श्रद्धेचा विषय असल्यानं झी 24 तासनं यामागचं सत्य शोधण्याचा प्रयत्न केला. आम्ही या व्हिडिओची पडताळणी केली तेव्हा काय सत्य समोर आलं पाहा.


व्हायरल झालेला व्हीडिओ खरा असून पाण्यावर दिसणारी मूर्ती शेषनागावर विराजमान असलेल्या विष्णू आणि लक्ष्मीची आहे. मात्र हे दृश्य महाराष्ट्रातील नसून आसामधल्या गुवाहाटीतलं आहे. ब्रह्मपुत्रा नदीच्या किनाऱ्यावर चक्रेश्वर मंदिर परिसरात ही मूर्ती आहे. मूर्तीखाली एक पिलर असून पाण्यामुळे तो दिसून येत नाही. ब्रह्मपुत्रा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली की हे अनोखं दृश्य पाहायला मिळतं. 


त्यामुळे आमच्या पडताळणीत व्हायरल होत असलेला व्हीडीओ खरा असल्याचं स्पष्ट झालंय. मात्र ही मूर्ती कुठेही अवतरलेली नाही. तर हा व्हीडिओ गुवाहाटीचा आहे, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेऊ नका.