Viral Polkhol : बातमी आहे एका (Viral Video) व्हायरल व्हीडिओची. देवदर्शनासाठी गेलेल्या एका भक्ताचा हा व्हीडिओ आहे. हा भक्त दर्शन घेताना हत्तीखाली अडकला. बराच वेळ झाला तरी भक्त हत्तीखाली अडकूनच होता. मग पुढे काय झालं? त्याची सुटका झाली का? चला पाहुयात. (fact check viral polkhol devotee got stuck in the elephant idol in the temple)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हत्तीखाली अडकलेल्या या भक्ताचा सुटकेसाठी सुरू आहे जीवघेणा थरार. जीव वाचवण्यासाठी या भक्ताचा संघर्ष सुरूये. झालं असं, हा भक्त नेहमीप्रमाणे मंदिरात दर्शनासाठी आला. देवाचं दर्शन घेतलं आणि हा मंदिरातील हत्तीच्या मूर्तीखालून यानं जाण्याचा प्रयत्न केला. पण, नको ते धाडस करताना हा हत्तीखाली अडकला आणि चांगलाच हैराण झाला. आता बघा ही मूर्ती किती छोटी आहे. तरीदेखील या भक्तानं मूर्तीखालून जाण्याचा प्रयत्न केला आणि हा मूर्तीखाली फसला. 



आपली सुटका होत नाहीये हे लक्षात येताच याने आरडाओरडा सुरू केला. त्यावेळी इतर भक्त आणि मंदिरातील पंडित मदतीसाठी आले. याला बाहेर ओढत होते. पण, हा काही यातून सुटत नव्हता. ओढून ओढून सगळेजण थकले  आणि मग यालाच सुटकेसाठी सल्ले देऊ लागले. आधीच हा भक्त जाड असल्यानं त्याला सहज यातून सुटणं शक्य नव्हतं. जवळपास 5 तास झाले तरी याची सुटका झाली नाही .नक्की हा व्हिडिओ आहे कुठला. पुढे काय झालं ते पाहुयात. 


व्हायरल पोलखोल


हा व्हिडिओ गुजरातमधील असल्याचं समोर आलं. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर हत्तीखालून भक्त जात होता. हत्तीच्या खाली जागा कमी असल्यानं भक्त अडकला. याची बराच वेळानंतर सुटका झाल्याची माहिती आहे. पण, मूर्ती छोटी असताना जायचंच कशाला? असाही सवाल विचारला जातोय. 


असाच प्रकार 3 वर्षांपूर्वी एका महिलेसोबत घडला होता. एक महिला मूर्तीखाली अडकली होती. तिलाही बाहेर काढण्यासाठी असेच प्रयत्न करावे लागले. अखेर तिची सुटका झाली. पण, ती घाबरली होती. असं म्हणतात देवावर श्रद्धा असावी, पण अंधश्रद्धा नसावी. यांनी अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन नको तो प्रकार केला. मात्र, असे प्रकार जीवावरही बेतू शकतात. त्यामुळे असं धाडस करू नका.