मुंबई  : केंद्रानं जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू केल्याचा दावा करण्यात आलाय. हा दावा केल्यानं लाखो कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. याबाबत कुणालाही माहिती मिळालेली नाहीये.त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली. त्यावेळी काय पोलखोल झाली चला पाहुयात. (fact check viral polkhol old pension scheme applicable for government empolyees know what truth what false)
 
दावा आहे की 29 मे रोजी कॅबिनेट मीटिंगमध्ये सरकारी कर्मचा-यांच्या जुन्या पेन्शन स्कीम बाबत मोठा निर्णय घेण्यात आलाय...2004 नंतरच्या कर्मचा-यांनाही पेन्शन मिळणार असल्याचा दावा व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आलाय...जुनी पेन्शन योजना हा लाखो कर्मचा-यांच्या जिवाळ्याचा विषय आहे. त्यामुळे आम्ही या दाव्याची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला. पण, आधी व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्मचाऱ्यांच्या हितासाठी जुन्या पेन्शनबाबत निर्णय घेण्यात आलाय. 2004 नंतर नोकरीत लागलेल्यांसाठी सरकारने पेन्शनसाठी निधी उपलब्ध केलाय. केंद्रीय आणि राज्य सरकारी कर्मचा-यांना 2023 पासून हा नियम लागू होईल. 


हा दावा केल्यानं आम्ही याची सत्यता जाणून घेण्यासाठी केंद्राकडे विचारणा केली. त्यावेळी असा कोणताही निर्णय झाला नसल्याचं कळलं. मग व्हायरल मेसेजमध्ये दावा कोणत्या आधारावर केलाय. याची आम्ही पडताळणी केली त्यावेळी काय पोलखोल झाली पाहा.


व्हायरल पोलखोल


पेन्शनबाबत व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये तथ्य नाही.  29 मे रोजी रविवार असल्याने त्यादिवशी कॅबिनेट बैठक नव्हती. जुन्या पेन्शनबाबत सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. 


पेन्शनबाबत केंद्र सरकारने निर्णय घेतलेला नसून, आमच्या पडताळणीत हा दावा असत्य ठरला. पेन्शनबाबत मेसेज व्हायरल करून कर्मचाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरूये. त्यामुळे अशा व्हायरल मेसेजवर विश्वास ठेवू नका.