मुंबई : देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षाही जास्त खतरनाक आणि वेगाने पसरणारी आहे. ज्यामुऴे अनेक लोकांचा जीव देखील गेला आहे. सुरुवातीला या रोगाला पसरण्यापासून थांबवणयासाठी लॅाकडाऊनसारखे कडक निर्बंध लावण्यात आले, त्यानंतर व्हॅक्सिनेशच्या मोहिमेला सुरवात करण्यात आली. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात आधी फ्रंटलाईन वर्कर्स, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 60 वर्षांनंतरच्या लोकांना कोरोना लसी देण्यात आल्या. त्यानंतर मग 1 मेपासून सरकारने 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी लसीकरणाला सुरुवात केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मागे सरकारचा एकच हेतू आहे की, यामुळे जास्तित जास्त लोकंचे लसीकरण पूर्ण होऊन आपला देश कोरोना मुक्तिकडे वाटचाल करेल. दरम्यान, लसांबद्दलच्या बऱ्याच अफवा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


आजकाल एक ट्वीट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे, त्यामध्ये असा दावा केला जात आहे की, भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना देण्यास मान्यता देण्यात आली आहे. पीआयबी फॅक्ट चेकच्या पथकाने याचा तपास केला आहे.


व्हायरल होत असलेल्या ट्वीटच्या स्क्रीनशॉटमध्ये असे लिहिले आहे की, 'भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला (मेड इन इंडिया) 12 वर्षाच्या मुलांना लसीकरणासाठी मान्यता देण्यात आली आहे.'


सत्य काय आहे


पीआयबी फॅक्ट चेकच्या टीमने ट्वीट केले आणि त्यात लिहिले आहे की, "एका ट्वीटमध्ये असा दावा केला गेला आहे की, भारत बायोटेक लस कोवॅक्सिन 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी मंजूर झाली आहे. हा दावा खोटा आहे. भारत सरकारकडून अशी कोणतीही मंजुरी देण्यात आलेली नाही. सध्या, केवळ 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचे नागरिक कोरोनाची लस घेण्यास पात्र आहेत."



त्यामुळे नागरिकांनी अशा खोट्या बातम्यांना बळी पडू नका. तसेच या बातम्यांना सोशल मीडियावर शेअर देखील करु नका. स्वत: सतर्क रहा आणि दुसऱ्यांनाही याला बळी पडून देऊ नका.