ट्रेनच्या जनरल डब्यात एका महिलेने चक्क पँट शर्ट आणि त्यावर गळ्यात रेल्वेचं कार्ड आणि गुलाबी रंगाचं जॅकेट घालून आपण टीटीई असल्याचं भासवत होती. एवढंच नव्हे तर ज्या प्रवाशाकडे तिकीट नाही त्यांच्याकडून जलन देखील कापताना ही महिली दिसली. आपण महिला टीटीई असल्याचं भासवणाऱ्या या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओत काही लोकांनी महिला टीटीईला वेगवेगळे प्रश्न विचारताना दिसत आहेत. झांसी स्टेशनवर हा प्रकार पडला आहे. या महिलेला RPF जवळ सुपुर्द केलं आहे. झांसी स्टेशनवर पातालकोट एक्सप्रेसवर जनरल कोचमध्ये बनावट महिला टीटीई पकडलं गेल्यावर हंगामा केला आहे. 


बनावट टीटीई महिलेला डबरा येथून कंट्रोल मेसेजवर झाशीला पोहोचलेली ट्रेन स्टेशन कर्मचाऱ्यांसह आरपीएफच्या ताब्यात देण्यात आली. आरपीएफ स्टेशन चौकीत पोहोचल्यानंतर तासाभराच्या चौकशीनंतर हे प्रकरण चर्चेत आले आणि त्यांनी जीआरपी पोलीस ठाण्यात माहिती दिली. आरोपीची बराच वेळ चौकशी करण्यात आली.


व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल



फिरोजपूरहून छिंदवाडाला जाणारी ट्रेन नंबर 14624 पातालकोट एक्सप्रेसमध्ये बनावट टीटीई प्रवाशांची तिकीट तपासताना दिसली. पण लोकांनी तिला पकडल्यामुळे एकच चर्चा झाली. डबरा स्टेशनवरुन पाठवलेल्या सुचनेनुसार सीटीआय राजेंद्र कुमार आणि महिला आरपीएफ कर्मचारी उमा सिंह यांनी बनावट महिलेला स्टेशनवर उतरुन नेण्यात आली. 


बराच वेळ चौकशी करूनही आरपीएफला कारवाई करता आली नाही. हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर आरपीएफने बनावट महिला टीटीईवर कारवाई करण्यासाठी जीआरपीशी संपर्क साधला. येथे जीआरपीने कोणत्याही तक्रारीच्या आधारे बनावट महिला टीटीईवर कारवाई करण्यास नकार दिला. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आरपीएफच्या ताब्यात आहे.