मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (Corona 2nd Wave) अनेकांना बेरोजगारीचा सामना करावा लागला. आता कुठे कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. कोरोना रुग्णसंख्येत आता काहीशी घट झाली आहे. यानंतर आता विविध कंपन्यांमध्ये मेगाभरती सुरु झाली आहे. आयटी क्षेत्रात (IT Sector) काम करण्यासाठी इच्छूक असणाऱ्या तरुण तरुणींसाठी आनंदाची बातमी आहे. प्रसिद्ध आयटी कंपनी इन्फोसिस (Hiring in Infosys) विविध पदांसाठी पदभरती करत आहे. इन्फोसीसने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. (famous it company Infosys hiring for graduates apply now know details)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इन्फोसीसने सिस्टम इंजीनिअर आणि सीनियर सिस्टम इंजीनिअर 2 पदासाठी ही पदभरती काढली आहे. इन्फोसीसला Java आणि Net बद्दल माहिती असलेल्या तरुणांची आवश्कता आहे. यासाठी उमेदवाराला किमान 1 ते  4 वर्षांचा फील्डवरील अनुभव आवश्यक आहे. इच्छूक उमेदवार 25 जुलैपर्यंत अर्ज करु शकतात.



सिस्टम इंजीनिअर


इन्फोसिसला सिस्टम इंजीनिअर या पदासाठी  BE/BTech/ME/MTech/MCA/MSc पर्यंत शिक्षण झालेल्या उमेदवारांची आवश्यकता आहे. तसेच त्यांना वर्षभराचा कामाचा अनुभव हवा. उमेदवाराकडे BCA/BSc पदवीधरही या पदासाठी अर्ज करु शकतात. पण अशा उमेदवारांना अनुभवाची अट जास्त ठेवण्यात आली आहे. पदवीच्या आधारावर अर्ज करणाऱ्यांना कामाचा अनुभव किमान 2 वर्षभराचा अनुभव असायला हवा.


सिनियर सिस्टम इंजीनिअर


सिनियर सिस्टम इंजीनिअर पदासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे BE/BTech/ME/MTech/MCA/MSc यापैकी कोणतीही पदवी असायला हवी. तसेच या उमेदवारांना कामाचा 2 ते 3 वर्षांचा अनुभव असायला हवा. तर BCA/BSc या पदवीच्या आधारावर अर्ज करणाऱ्यांना कामाचा 3 ते 4 वर्षांचा कामाचा अनुभव असणं  आवश्यक आहे.