प्रसिद्ध वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांचे कोरोनामुळे निधन
प्रसिद्ध वृत्तनिवेदक आणि जेष्ठ पत्रकार रोहित सरदाना यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले.
नवी दिल्ली : कोरोनाचा संसर्गाने भयावह रुप धारण केले आहे. राजधानी दिल्लीत रुग्णांची हेळसांड होत आहे. त्यातच प्रसिद्ध वृत्तनिवेदक आणि जेष्ठ पत्रकार रोहित सरदाना यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. Zee News चे मुख्य संपादक सुधीर चौधरी यांनी ट्वीट करीत ही माहिती दिली.
रोहित सरदाना यांच्या निधनाचे ट्वीट करताना चौधरी यांनी म्हटले की, 'थोड्यावेळापूर्वी जितेंद्र शर्मा यांचा फोन आला होता. त्यांनी जे म्हटले ते ऐकून माझे हात कापायला लागले. ती आमचे मित्र आणि माजी सहकारी रोहित सरदाना यांच्या निधनाची बातमी होती. हा व्हायरस आपल्या इतक्या जवळच्या व्यक्तीला घेऊन जाईल याची कल्पना नव्हती. या दुःखद बातमीसाठी मी तयार नव्हतो. हे देवा हा अन्याय आहे. ॐ शान्ति.'
रोहित सरदाना यांनी अनेक वर्ष Zee News मध्ये वृत्तनिवेदक म्हणून काम केले होते.