मला लग्न करायचंय म्हणत हनीट्रॅपमध्ये अडकवलं आणि...; फेमस Youtuberला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Honeytrap : या युट्युबरने आपल्या पतीलाही या कटात सामील केले होते. दोघांनी व्यावसायिकाला दारु पाजली आणि एका हॉटेलच्या रुममध्ये नेलं
Youtuber Namra Qadir : ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) करून पैसे उकळण्याचे प्रकार सर्रास पाहायला मिळतात. पण हनीट्रॅपद्वारे फसवणूक केल्याची गंभीर प्रकरणेही अनेकदा समोर आली आहेत. अशाच एका प्रकरणात प्रसिद्ध युट्यूबरला अटक करण्यात आली आहे. एका व्यावसायिकाला हनीट्रॅपमध्ये (Honey trapping) अडकवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या युट्यूबर नामरा कादिरला पोलिसांनी अटक केली आहे. व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी नामराला अटक केलीय. पोलीस आता नामराचा पती विराट बैनीवालच्या शोधात आहेत. विराटच्या अटकेसाठी विविध ठिकाणी छापे घातले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Famous YouTuber Namra Qadir trapped businessman in honeytrap extorted 70 lakhs)
नामरा सोशल मीडियावर बरीच फेमस आहे. युट्यूबर 6 लाख तर इन्स्टाग्रामवर तिचे 2 लाख फॉलोअर्स आहेत. अल्पावधीत फेम मिळवलेल्या या युट्यूबरचे सत्य हनीट्रॅपमध्ये एका व्यावसायिकाला अटक केल्याप्रकरणी अटक केल्यानंतर समोर आले आहे. या व्यावसायिकाने 24 नोव्हेंबर रोजी गुडगाव सेक्टर 50 च्या पोलीस ठाण्यात नामराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
असं अडकवलं जाळ्यात
आपल्या पतीसोबत मिळून नामराने गुडगाव येथील एका व्यापाऱ्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं असा आरोप आहे. त्यानंतर खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. यासोबत त्यांनी व्यावसायिकाकडून 80 लाखांपेक्षा जास्तीचे जबरदस्तीने वसूली केली. व्यावसायिकाने तक्रार दाखल केल्यानंतर नामराला अटक करण्यात आलीय.
पतीची मित्र म्हणून ओखळ सांगितली
"मी कामानिमित्त नामराला रेडिसन हॉटेलमध्ये भेटलो होतो. तिने मला विराटसोबत माझा मित्र आहे असे सांगत भेट घडवून दिली. त्यांनी माझ्या कंपनीत काम करण्यास होकार दिला आणि दोन लाख रुपये आगाऊ घेतले. मी त्याच दिवशी पैसे दिले, कारण मी नामाराला आधीपासून ओळखत होतो. नंतर, जेव्हा मी त्यांच्यासाठी जाहिरातीचे काम आणले तेव्हा तिने हो म्हटले आणि आणखी 50,000 रुपये मागितले. मी पैसे त्यांच्या खात्यावर पाठवले," असे व्यावसायिकाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
सकाळी उठलो तेव्हा...
"त्यांनी माझे काम केले नाही. नामराने सांगितले की, तू मला आवडतो आणि लग्न करायचं आहे. तुझे पैसे लग्नानंतर देईल असे नामराने मला सांगितले. मलाही ती आवडायला लागली आणि आम्ही एकत्र फिरू लागलो. विराट कायम तिच्या सोबत असायचा. एकदा आम्ही पार्टी करायला गेलो तेव्हा दोघांनी मला दारू पाजली. त्यानंतर आम्ही एका हॉटेलमध्ये रुम बूक केला आणि तिथे झोपी गेलो. सकाळी उठलो तेव्हा नामराने माझे कार्ड मागितले आणि ब्लॅकमेल करु लागली. मी तिचे म्हणणे ऐकले नाही तर बलात्काराचा गुन्हा दाखल करेल अशी धमकी ती देऊ लागली. यावेळी विराटनेही मला धमकवायला सुरुवात केली. त्यानंतर घाबरून मी आता पर्यंत त्यांना 70 ते 80 लाखांपर्यत पैसे आणि वस्तू खरेदी करुन दिल्या. ज्याचे माझ्याकडे पुरावे आहेत," असे तक्रारदाराने म्हटले आहे.