स्मृती ईरानी यांचा ट्रांसफॉर्मेशन लूक पाहून चाहत्यांना बसला आश्चर्याचा धक्का
आजकाल स्मृती इराणी या ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आल्या आहेत. त्यांचे वजन कमी झाल्याचे पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
मुंबई : लोकप्रिय मालिका 'क्योंकी सास भी कभी बहू थी' मधून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री स्मृती इराणीने या शोमध्ये तुलसी विराणीची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या हृदयावर वर्षानुवर्षे राज्य केले आहे. आजही त्या प्रेक्षकांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. त्यांनी जरी आता राजकारणात प्रवेश केला आहे, परंतु तरीही त्या केवळ एक सुसंस्कृत सून आणि टीव्ही पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. आजकाल स्मृती इराणी या ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आल्या आहेत. त्यांचे वजन कमी झाल्याचे पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
स्मृती इराणी यांनी सोशल मीडियावर स्वतःचे तीन फोटो शेअर केले. जे कोलाजमध्ये बनवले गेलेत. या फोटोंद्वारे त्याने मास्क घालणे किती महत्त्वाचे आहे याकडे लक्ष वेधलं दिले. कॅप्शनमध्ये स्मृती इराणी यांनी लिहिले, "सोमवार मंत्र, कानातले घाला, नाकातली घाला किंवा नका घालू, पण मास्क घाला. कारण आताही दोन हात अंतर आणि मास्क आवश्यक आहे."
हा फोटो पाहून, स्मृती इराणींचे चाहते त्यांचे वजन कमी झाल्याबद्दल बोलत आहेत. एका चाहत्याने लिहिले, "मूळ स्मृती बेन परत आली आहे."
वयाच्या 21 व्या वर्षी स्मृती इराणी सौंदर्य स्पर्धा फेमिना मिस इंडिया (1998) मध्ये सहभागी झाल्या होत्या. स्मृती इंग्रजी साहित्य आणि क्रीडा-साहसांची आवड आहे. यासोबतच त्यांना राजकारणातही रस आहे. आज त्या केंद्रीय मंत्री देखील आहेत.