MBA करायचं होतं पण 3 वेळा अपयश आलं...हा व्यवसाय करून बनला करोडपती
शेतकऱ्याच्या मुलाला 3 वेळा CAT मध्ये अपयश... जिद्द सोडली नाही हा व्यवसाय सुरू करून बनला करोडपती
मुंबई: एका शेतकऱ्याच्या मुलाला IIM मध्ये शिकण्याचा ध्यास घेतला. मात्र CAT च्या परीक्षेत येणाऱ्या सतत अपयशानं पाठ सोडली नाही. एकदा नाही तीन वेळा त्याला परीक्षेत अपयश आलं. पण असं म्हणतात की एखादी गोष्ट करायची जिद्द असेल तर सर्व काही शक्य आहे. मध्य प्रदेशच्या प्रफुल्ल बिलोरे यांनी हे सत्य सिद्ध केले.
बर्याच विद्यार्थ्यांप्रमाणे प्रफुल्लचेही उच्च आयआयएममधून व्यवसाय आणि उद्योजकतेचा अभ्यास करण्याचे स्वप्न होते. मात्र त्यावेळी परीक्षेत त्याला यश मिळालं नाही. शिवाय तीन वर्ष गेली ती वेगळीच. प्रफुल्लने हार मानली नाही आणि चहाचा व्यवसाय सुरू केला.
या चहाच्या व्यवसायात आज तो इतका यशस्वी आहे की त्याच्या व्यवसायाची उलाढाल करोडोंमध्ये आहे. सर्वजण त्यांना ‘करोडपती चायवाला’ या नावाने ओळखतात. धारमधील एका लबरावदा नावाच्या छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबातील प्रफुल्ल बिल्लूर याचा जन्म झाला. आयआयएम अहमदाबादमधून एमबीए करायचं त्यांचं स्वप्न होतं. त्यासाठी त्यांनी अहमदाबादला जाऊन बरीच तयारी केली. सलग तीन वर्षे कॉमन अॅडमिशन टेस्टची (CAT) तयारी करूनही त्याला आयआयएममध्ये प्रवेश मिळू शकला नाही.
पैसे कमवण्यासाठी तो मुंबईतही गेला पण तिथेही त्यांना यश मिळाले नाही. अहमदाबादला आले आणि मॅकडोनाल्डमध्ये नोकरी मिळवली. तिथे तो 12 तास काम करायचा. त्याला प्रत्येक तासाचे 37 रुपये मिळायचे. एक वेळ अशी आली प्रफुल्लला वाटलं की तो नोकरी करण्यासाठी बनलेली नाही.
स्वत: व्यवसाय सुरू करायला हवा असं प्रफुल्लला वाटू लागलं. ही कल्पना त्याच्या डोक्यात आली. त्यानं व्यवसाय सुरू करण्यासाठी पूर्ण नियोजन तयार केलं. प्रफुल्ल यांच्याकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे नव्हते. हातात जास्त पैसे नसल्याने कमी गुंतवणुकीत जो व्यवसाय होऊ शकतो असा सुरू करण्याचा विचार केला.
प्रफुल्लने वडिलांशी खोटे बोलून अभ्यासाच्या नावाखाली 10 हजार रुपये मागितले. यानंतर त्यांनी कॉलेजच्या बाहेर चहाचा स्टॉल लावायला सुरुवात केली. सुरुवातीला प्रफुल्लच्या दुकानात चहा प्यायला लोक येत नव्हते. म्हणूनच तो स्वतः चहाचे ताट घेऊन लोकांकडे जाऊ लागला आणि त्यांना इंग्रजीत चहा विकू लागला.
हळूहळू लोकांना इंग्रजी बोलणारा चहा विकणारा आवडू लागला आणि त्याच्या स्टॉलवर गर्दी होऊ लागली. प्रफुल्ल म्हणाल की, त्यांनी त्यांच्या चहाच्या स्टॉलचे नाव 'मिस्टर बिल्लोरे अहमदाबाद चाय वाला' ठेवले आहे. ज्याला शॉर्टमध्ये MBA चाय वाला' असंही म्हटलं जातं. अशा प्रकारे MBA चाय वाला या नावाने प्रफुल्लचे काम सुरू झाले.
प्रफुल्लचा चहाचा व्यवसाय सुरू झाला होता. पण काही दिवसांनी त्यांना त्यांचा स्टॉल तिथून काढावा लागला. त्याने हार न मानता भाड्याने छोटेसे दुकान घेऊन पुन्हा चहाचे काम सुरू केले. प्रफुल्लच्या चिकाटीमुळे आज तो यशस्वी झाला आहे. आज MBA चायवालाचे देशभरात 22 पेक्षा जास्त आउटलेट आहेत. आता लवकरच एक आंतरराष्ट्रीय आउटलेट उघडणार आहे.
एक काळ असा होता की प्रफुल्लला MBA करण्यासाठी IIM मध्ये जायचे होते. कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं. प्रत्येक गोष्टीतून पैसा कमावता येतो. फक्त तो कसा कमवायचा हे आपल्याला कळायला पाहिजे असं प्रफुल्ल म्हणाला. प्रफुल्ल बिलोरे सोशल मीडियावरही खूप प्रसिद्ध आहेत. इंस्टाग्रामवर त्याचे 5.5 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.