नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नव्या कृषी कायद्यांची (Farm Law) पाठराखण केली आहे. कृषी सुधारणांसाठी नवे कायदे उपयुक्त आहेत, असे ठाम मत मोदी यांनी यावेळी व्यक्त केले. तर दुसरीकडे गेले दोन आठवडे शेतकऱ्यांचे कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन (Farmers' protest) सुरु आहे. आता शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच करण्याचा निर्णय घेतला आहे. हे कायदे रद्द करावे यासाठी शेतकरी ((Farmer) आक्रमक झाले आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फिक्कीच्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या कृषी कायद्यांची जोरदार पाठराखण केली. कृषी क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी नवे कायदे अत्यंत उपयुक्त आहेत. नव्या कायद्यांमुळं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल. त्यांना अनेक पर्याय उपलब्ध होतील, अशा शब्दांत मोदींनी कृषी कायद्यांचं समर्थन केलं. नवे कायदे अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा देणार आहेत, असे ते म्हणाले. दुसरीकडे कृषी कायदे हटवण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं दिल्लीत आंदोलन सुरू केले आहे.


कृषी कायद्यात सुधारणांवर भर देण्यात आला आहे. या कायद्यांचा शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे. कृषी क्षेत्र आणि त्याच्याशी निगडीत अन्य क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधा असो, फूड प्रोसेसिंग, साठवण्याची प्रक्रिया, कोल्ड चेन यामधील अडथळे पाहिले आहेत. ते दूर करण्यासाठी प्रयत्न केले गेले आहेत. आता यांच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व भिंती हटवल्या जात आहेत. सर्व समस्या दूर केल्या जात आहेत, असे मोदी म्हणाले.