दुजानाला चकमकीत ठार केल्याबद्दल फारूख यांनी सैन्यांची केली प्रशंसा
लष्कर ए तोयबाचा कमांडर अबु दुजाना कश्मिऱात चकमकीत ठार झाला, त्याबद्दल नॅशनल कॉन्फरन्सचे नेता फारूख अब्दुल्ला यांनी मंगळवारी सुरक्षा दलाची प्रशंसा केली आहे.
नवी दिल्ली : लष्कर ए तोयबाचा कमांडर अबु दुजाना कश्मिऱात चकमकीत ठार झाला, त्याबद्दल नॅशनल कॉन्फरन्सचे नेता फारूख अब्दुल्ला यांनी मंगळवारी सुरक्षा दलाची प्रशंसा केली आहे.
संसदेबाहेर पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी सांगितले की, मला आशा आहे, ते राज्यात चांगले काम कायम ठेवतील त्यामुळे आमच्या राज्यात शांती प्रस्थापित होईल.
सुरक्षा रक्षकांवर अनेक हल्ल्यांसाठी हवा असलेला पाकिस्तानी नागरिक दुजाना आणि त्याचे साहाय्यक काश्मिरातील पुलवामा येथील चकमकीत ठार झाला.
सुरक्षा दलाचे जवान दहशतवाद विरोधी अभियानात सामील झाले तेव्हा १०० पेक्षा अधिक आंदोलकांनी त्यांच्यावर दगडफेक केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की अबु दुजाना आणि त्याच्या स्थानिक सहाय्यक आरिफ लीलहारी पुलवामाच्या हकरीपुरा भागात असल्याची माहिती मिळाली, त्यामुळे त्यांनी भाग पिंजून काढण्यात सुरूवात केली.
दहशतवादी आणि सैन्यात मंगळवारी पहाटे चकमक झाली. तयात दोन दहशतवादी ठार झाले.