नवी दिल्ली : जम्मू कश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांचा एका लग्नातील डान्सचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंगच्याच्या नातीच्या लग्नात फारुख अब्दुल्ला 'आज कल तेरे मेरे प्यार के' या गाण्यावर थिरकताना दिसले. 
 
 83 वर्षीय अब्दुल्ला यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंहच्या नातीच्या लग्नात उपस्थिती लावली होती. त्यावेळी त्यांनी मोहम्मद रफी यांच्या 'आज कल तेरे मेरे  प्यार के' आणि 'गुलाबी आंखे जो तेरी देखी' या गाण्यांवर ताल धरला. डान्स करताना अब्दुल्ला यांनी अमरिंदर यांचाही हात धरला आहे.  दीड मिनिटांची व्हिडिओ क्लिप समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल होत  आहे. क़ॉंग्रेसनेते सरल पटेल  यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे.  



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 समाजमाध्यमांवर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक वापरकर्त्यांनी अब्दुल्ला यांच्या या वयातील ऊर्जा आणि उत्साहाचे कौतुक केले आहे.