मुंबई : भारताचे लोकप्रिय फॅशन डिझाइनर वेन्डेल रॉड्रिक्स (Wendell Rodricks) यांच निधन झालं आहे. 60 वर्षांच्या वेन्डेल रॉड्रिक्स यांचं गोव्यात निधन झालं असल्याची माहिती एजन्सीने दिली आहे. 28 मे 1960 मध्ये गोव्यात वेन्डेल यांचा गोव्यात जन्म झाला होता. मात्र त्यांच शिक्षण मुंबईत पार पडलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका कॅथलिक गोअन फॅमिलीमध्ये जन्माला आलेले वेन्डेल यांनी फॅशन डिझाइन या क्षेत्रात आपलं करिअर केलं. त्यांनी गार्डन वरेली, लॅक्मे कॉस्मेटिक्स आणि डीबीयर्सकरता डिझाइनर म्हणून आपल्या करिअरला सुरूवात केली. 



2014 मध्ये भारत सरकारद्वारे सर्वोच्च नागरिक पुरस्कार पद्मश्री अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहेत. वेन्डेल एक फॅशन डिझाइनर असून लेखक, पर्यावरण रक्षक आणि समलैंगिक अधिकाराचे समर्थन करणारे म्हणून ओळखले जातात. 



वेन्डेल रॉड्रिक्स यांच्या निधनावर केंद्रीय मंत्री स्मृती इरानी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. 'वेन्डेल रॉड्रिक्स यांच्या निधनाने धक्का बसला आहे. वेन्डेल रॉड्रिक्स भारतातील लोकप्रिय फॅशन डिझाइनर होते. या दुःखाच्या प्रसंगी मी त्यांच्या कुटुंबासोबत आहे. त्यांच्या आत्माला शांती मिळो.' सोशल मीडियावर देखील वेन्डेल रॉड्रिक्स यांना आदरांजली वाहण्यात आली. 



वेन्डेल यांनी दोन सिनेमांत देखील काम केलं आहे. 'बूम' आणि 'फॅशन' या दोन सिनेमांत त्यांनी काम केलं आहे.