VIDEO: अरे देवा! भर फॅशन शोमध्ये मॉडेल टेबलवरून उठली, ड्रेस खेचला अन्...
Video: सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात एका मॉडेलसोबत असाच काहीसा प्रकार घडला आहे. त्यामुळे जमलेले प्रेक्षक जागच्या जागीच थक्क झाले.
Viral Fashion Show Video: सोशल मीडियावर अनेक तऱ्हेचे व्हिडीओज (Video) हे व्हायरल होत असतात. कधी ते आपल्याला पोट भरून हसवणारे असतात तर कधी टचकन डोळ्यात पाणी आणणारे असतात. त्यामुळे आपल्यालाही असे व्हिडीओज हे इतरांसोबत शेअर (Model Dress as table cloth) करावेसे वाटतात. परंतु काही व्हिडीओज हे आपण इतरांसोबत शेअर करूही शकत नाही आणि ते म्हणजे उप्स मुमेंट्स (Oops Moments). स्त्रियांना विशेषत: तरूण मुलींना आपल्या ड्रेसची काळजी घेणेही अत्यंत आवश्यक असते. नाहीतर त्यांना उप्स मुमेंट्सना फार वाईट पद्धतीनं सामोरे जावे लागते. अशा चुका या अनावधानानं होतात. परंतु एकदा त्या सार्वजनिक झाल्या तर त्याला तुम्ही आम्ही काहीच करू शकत नाही. त्यातून मोठ्या फॅशन शोजमध्ये अशा अनेक गोष्टी होतात जेथे तरूण मॉडेल्सना खूप काळजी घ्यावी लागते. कधी हिल्सवरून (Heels) त्या पडतात तर कधी त्यांना ड्रेसवरून अवघडल्यानं पडायलाही होते. (fashion show viral video model wears dress with table cloth that shocks everyone)
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात एका मॉडेलसोबत असाच काहीसा प्रकार घडला आहे. त्यामुळे जमलेले प्रेक्षक जागच्या जागीच थक्क झाले. फॅशन शोमध्ये अशा प्रसंगाना अनेकदा तोंड द्यावे लागते परंतु त्याचसोबतच अशा अनेक मॉडेल्स आहेत ज्यांना अशा प्रसंगांना तोंड तर द्यावे लागतेच परंतु त्यामुळे त्या खचत नाहीत किंवा हतबल होत नाहीत त्या पुन्हा एकदा त्यांच्या पायावर उभ्या राहतात आणि पुन्हा एकदा त्यांच्या ग्लॅमरस अंदाजनं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतात.
परंतु सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये तर तिच्या एका कृतीनं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. हा व्हिडीओ कोपनहेगन फॅशन वीकमधला (Copenhagen Fashion Week) आहे. फॅशन डिझायनर नन्ना आणि सायमन विक यांनी त्यांचे विंटर कलेक्शन यावेळी सादर केले होते. त्यादरम्यान एका हटके फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी अनेक फॅशन क्षेत्रातल्या दिग्गजांनी या फॅशन शोला उपस्थितीत दर्शवली होती. यावेळी एका मॉडेलनं मात्र सगळ्यांनाच आश्चर्यचकित करून सोडलं.
या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, येथे मॉडेल एका टेबलावर बसली आहे आणि तिथून ती रॅम्पवर वॉक करायला उठली तेवढ्यातच तिच्या ड्रेसपाठोपाठ टेबलक्लॉथही (Table Cloth) सरकत गेला आणि क्षणार्धात झालेली ही गोष्ट पाहून सगळेच अवाक झाले आणि सगळ्यांनीच टाळ्या वाजवल्या. त्यामुळेच सगळ्यांनीच तिची प्रशंसा केली.
हा व्हिडीओ सध्या सगळीककडेच व्हायरल होतो आहे. @(Di)vision ने इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याला अनेक विविध प्रतिक्रियाही येत आहेत.