Fashion Tips: आयडियाची कल्पना...टाईट ब्लाऊजला न उसवता बसवा तुमच्या मापात, कसं ते पाहा...
आता ब्लाऊज न उसवता तुम्ही फिटिंग करू शकता ? ऐकून थोडा आश्चर्य वाटलं असेल ना पण हो हे खरं आहे, अशी एक भन्नाट कल्पना आहे ती वापरून तुम्ही ब्लाऊज परफेक्ट साईझमध्ये परिधान करू शकता (Simple Hacks For Perfect Fitting Blouse)
Fashion hacks: आजकाल साडी नेसताना कॉन्ट्रास्ट ब्लाउज घेण्याची फॅशन (contrast blouse on saree) आहे त्यामुळे जुने ब्लाऊजसुद्धा आपण जपून ठेवतो. मात्र खरी पंचाईत तेव्हा होते साडीवर घालायचा म्हणून एखादा जुना ब्लाउज आपण कपाटातून काढतो पण तो ब्लाऊज आपल्याला घट्ट होतो किंवा एकत्र सैल होतो आणि मग काय करायचं अश्यावेळी असा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. बरं आयत्या वेळी टेलर कुठून आणायचा , ब्लाऊज उसवयीचा कसा अश्या सगळ्या प्रश्नांचं काहूर माजत आणि आपलं डोकं फार खराब होऊन जात. (blouse hacks for saree)
पण जर आम्ही तुम्हाला सांगितलं कि आता ब्लाऊज न उसवता तुम्ही फिटिंग करू शकता ? ऐकून थोडा आश्चर्य वाटलं असेल ना पण हो हे खरं आहे, अशी एक भन्नाट कल्पना आहे ती वापरून तुम्ही ब्लाऊज परफेक्ट साईझमध्ये परिधान करू शकता (Simple Hacks For Perfect Fitting Blouse)
ब्लाऊज घट्ट होत असेल तर...
ही एक मस्त युक्ती इन्स्टाग्रामच्या irahoclothing या पेजवर शेअर करण्यात आली आहे. पण हे हॅक अशाच ब्लाऊजना कामी येईल ज्यांच्या मागील बाजूला बटनांच ऑप्शन दिलेलं असेल. फ्रंट बटन असतील तर हे हॅक तुम्हाला लागू होणार नाहीत.
हा हॅक वापरण्यासाठी दोन बांगड्या, एक लेस दोन पिनांची गरज लागणार आहे.
सर्वप्रथम जिथे ब्लाउजचे हुक आणि काज केलेलं असतात त्या दोन्ही बाजूंमध्ये एक एक बांगडी अडकवून घ्या आणि व्यवस्थित पिनअप करून घ्या, गरज भासली तर एक ऐवजी दोन पिनांचा वापर करा.
त्यानंतर साडी आणि ब्लाऊजवर मॅचिंग होणारी लेस निवडा आता दोन्ही बांगड्या लेसच्या मदतीने एकमेकींना बांधून टाका. समजा मॅचिंग लेस नाही मिळाली तर तुम्ही सोनेरी रंगाची ल्ससुद्धा वापरू शकता,आणि आता पुन्हा एकदा हा ब्लाउज घालून बघा!
ब्लाऊज फिटिंग होईलच पण मागील बाजूने स्टायलिश सुद्धा दिसेल हे नक्की. आणखी एक महत्वाचं दोन बांगड्या वापरून जर जास्तच सैल होत असेल तर एक बांगडी वापरा.
ब्लाऊज तर फिटिंगचं येईलच पण मागच्या बाजूने खूप छान- स्टायलिश असा नेक पॅटर्नही तयार होईल.
जर दोन बांगड्या वापरून ब्लाऊज कंबरेला खूप मोठं झालं तर एकाच बांगडीचा वापर करा. त्याच बांगडीला ब्लाऊजची दोन्ही टोकं पिनअप करा. लेस वापरण्याचीही गरज नाही.