धौलपूर : जगात विज्ञानाचा प्रसार झपाट्याने होत असला तरी अद्याप अनेक ठिकाणीही अंधश्रद्धेला बळी पडत असलेल्या लोकांची संख्या काही कमी नाहीये. अशीच एक घटना धौलपूर शहरापासून काही अंतरावर असलेल्या गावात घडलीये. बहलपूर गावात राहणाऱ्या रामदयाल कुशवाहा यांनी ९ महिन्यांपूर्वी मृत पावलेल्या आपल्या मुलाचा जिवंत करण्याच्या प्रयत्नात असे काही केले जे वाचून तुम्हीही हैराण व्हाल. 


९महिन्यांपूर्वी झाला होता मृत्यू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

९ महिन्यांपूर्वी रामदयाल यांच्या मुलाचा आजाराने मृत्यू झाला. मात्र त्याला जिंवत करुन देतो असे रामदयाल यांना एका मांत्रिकाने सांगितले. यासाठी त्याच्या हाडाचा सापळा जमिनीतून खोदून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर हा मांत्रिक तब्बल सहा तास तंत्र-मंत्र करत होता. हैराण करणारी बाब म्हणजे पोलिसांनीही पुजारी विक्षिप्त माणूस म्हणून या घटनेकडे दुर्लक्ष केले. 


दैनिक भास्करच्या बातमीनुसार रामदयाल यांना तीन मुली आहेत. त्यांची पत्नी आताही गरोदर आहे. रामदया यांचा ११ महिन्यांचा मुलगा आजारपणामुळे गेला होता. सोमवारी सकाळी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी रामदयाल असे काही करत असल्याची चर्चा गावात पसरली.. सकाळी साधारण साडेदहाच्या सुमारास रामदयाल शेतात गेला आणि खोदून मुलाच्या हाडाचा सापळा बाहेर काढला आणि काळ्या कपड्यात गुंडाळून मांत्रिकाकडे आणले. दरम्यान, याप्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाहीये.