कानपूर : ज्या हातांनी मुलगा आणि सुनेला सुखी संसारासाठी आशीर्वाद दिले त्याच हातांनी वर्षभरात दोघांचा संसार उद्ध्वस्त केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडील प्रत्येक दाम्पत्यासाठी मायेचं आणि आधाराचं छत्र असतात मात्र त्यांनीच घात केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलाचा संसार संपवल्याचा गुन्हा अखेर वडिलांनीच पोलिसांसमोर कबूल केला. यावेळी त्यांनी मला मी केलेल्या गोष्टीचा पश्चाताप नाही. मुलगा आणि सूनेनं मला हे करायला भाग पाडलं असं आरोपी वडिलांनी पोलिसांना सांगितलं.


74 वर्षांच्या व्यक्तीनं आपल्या मुलगा आणि सुनेची निर्घृण हत्या केली. बुधवारी रात्री उशिरा आयपीएलचे सामने पाहून दोघंही झोपायला गेले. तेव्हा रात्री धारदार शस्त्राने वार करून मुलगा-सुनेचं आयुष्य संपवलं. 


आरोपी व्यक्तीनं या घटनेनंतर हात धुवून तिथून पसार झाला आणि दुसरीकडे जावून झोपला. गुरुवारी पहाटेच्या सुमारास दाम्पत्याची हत्या झाल्याची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर चौकशीदरम्यान हा सगळा प्रकार समोर आला. 


मृत तरुण शिवमने 1 वर्षापूर्वी सामूहित विवाहातून लग्न केलं होतं. शिवम आणि जुली यांना त्यावेळी वडिलांनी आशीर्वादही दिले. पहिला एक महिना सगळं नीट सुरू होतं. मात्र हळूहळू वाद वाढायला लागले. 


मुलगा आणि सुनेची हत्या करण्यामागचं कारण सांगण्यासाठी आरोपी वडील अद्याप तयार झाले नाहीत. मात्र सध्या पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. त्यांनी गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील कानपूरमधील बजरिया परिसरात घडल्याची माहिती मिळाली आहे.