उदयपूरमधून धक्कादायक बातमी समोर आली असून सासरा गैरवर्तन करत असल्याची तक्रार सूनेने केली. त्यानंतर वडील आणि मुलामधील वाद टोकाला गेला. ज्यात मुलाने वडिलांची हत्या केलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सासरे सुनेसोबत अश्लील कृत्य करायचे. एक दिवस सासऱ्यांच्या गैरवर्तनाने त्रस्त झालेल्या सुनेने रोज होणारा त्रासाबद्दल अखेर पतीला सांगितलं. या घटनेने परिसरात खळबळ उडालीय. पोलीस या प्रकरणाचा तपास सुरु असून मुलगा फरार आहे. सासरे हे वडिलांच्या जागी असतात. अशात या घटनेने सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. सासरे सूनेच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे सर्वांना धक्का बसलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उदयपूरच्या बेकरिया पोलीस स्टेशन हद्दीतील बेदादर गावातून ही धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पतीने वडिलांचं कृत्याबद्दल सांगितल्यावर मुलाच्या पायाखालची जमीनच सरकली. संतापाचा भरात मुलगा वडिलांना जाब विचारायला गेला. त्यानंतर वडील आणि मुलामध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यात मुलगा दिनेशने वडील रावताराम यांना काठीने मारहाण करायला लागला. त्यामुळे वडिलांच्या डोक्याला दुखापत होऊन त्यांना रक्तस्त्राव झाला. मुलाने वडिलांना इतकी बेदम मारहाण केली की त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेबद्दल समजताच गावकऱ्यांनी एकच गर्दी केली आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. 


पण पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत आरोपी दिनेश फरार झाला होता. यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलंय. या घटनेतील आरोपीविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतकावर आपल्या सुनेसोबत अश्लील कृत्य केल्याचा आरोप सुनेने चौकशीदरम्यान सांगितलंय. यावरून पिता-पुत्रांमध्ये भांडण झाल्याच तिने पोलिसांना सांगितलं.