माझी पत्नी बनून राहा, सासऱ्याने सूनेला अश्लील मेसेज व व्हिडिओ पाठवले, पुढं काय घडलं?
Crime News In Marathi: सासऱ्याने सुनेकडे अश्लील मागणी केली. सुनेने विरोध करताच सासऱ्याने घृणास्पद प्रकार केला आहे.
Crime News In Marathi: नात्याला काळिमा फासणारा प्रकार घडला आहे. सूनेला मुलगी समान मानणाऱ्या आपल्या देशात सासऱ्यानेच घृणास्पद प्रकार केला आहे. बिहार जिल्ह्यातील दरभंगा येथे राहणाऱ्या एका महिलेने पोलिसांत सासऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेत अटक केली आहे. या प्रकरणी कुटुंबात एकच गोंधळ निर्माण झाला आहे. तर परिसरात एकच गोंधळ उडाला आहे. आरोपी सासरा अशोक पासवानला पोलिसांनी अटक केली आहे.
महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, माझ्या सासूचे जवळपास चार वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर सासऱ्यांनी माझ्या पतीला कमावण्यासाठी बाहेर पाठवले. त्यानंतर माझे सासरे आणि नणंदमला वारंवार हुंड्यासाठी छळ करत होते. त्याचवेळी सासरे मला त्यांच्या शरीराला मालिश करण्यास सांगत होते. मी जेव्हा त्यांना मालिश करुन देत असे तेव्हा खोलीचा दरवाजा बंद करुन त्यांना माझा हात पकडला आणि माझ्यासोबत अश्लील गोष्टी करु लागले. तसंच, मला त्यांच्याशी संबंध बनवण्यास जबरदस्ती करत होते. मला त्यांची पत्नी बनून राहण्यास सांगत होते, अशी तक्रार महिलेने केली आहे.
महिलेने पुढे म्हटले आहे की, सासऱ्यांच्या रोजच्या त्रासाला वैतागून मी गेले दोन वर्ष माहेरी राहत होते. त्यानंतरही त्याचा त्रास कमी झाला नाही. ते मला रोज मोबाईलवर अश्लील अश्लील व्हिडिओ पाठवत होते. याची माहिती जेव्हा मी माझ्या पतीला दिली तेव्हा त्यानेही काही बोलण्यास नकार दिला. घरातून कोणीच सासऱ्याच्या वागण्याचा विरोध केला नाही तेव्हा महिलेने थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी महिला ठाण्याध्यक्ष नुसरत जहांने सांगितले की, पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर आम्ही लगेचच कारवाई करत महिलेच्या पतीला अशोक पासवानला अटक केली आहे. या प्रकरणी महिलेचे माहेरचे लोक खूपच संतापले होते. या प्रकरणात आम्ही अधिक चौकशी करत आहोत.